देवानंद प्रेमानेच प्रतिनिधी तालुका
कोरोणा चा पादुर्भाव वाढत असल्याने आपल्या गावातील वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच, आशा सेवीका , यांनी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन तपासणी करुन कोणत्याही व्यक्तीला कोरोणा चे लक्षणे आढळून आल्यानंतर सरकारी हाँस्पिटल मध्ये जाण्याची विनंती केली ग्रामपंचायत शेलोडी, सरपंच ,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील तसेच तंटा मुक्ती अध्यक्ष COVID_19 या महामारीच्या काळात ग्रामपंचायतिने गावासाठी घेतलेले निर्णय.06.05.2021 ते 16.05.2021 पर्यंत घेण्यात आलेले निर्णय. तसेच संभव्य परिस्तिथी बिघडल्यास निर्णय पुढे वाढू शकतात.
1. गावामंध्ये फिरत असताना बिनामास आढळून आल्यास 100 रु दंड आकारण्यात येईल.
2 .किराणा दुकान व चक्की 07:00 ते 11:00 सुरू राहील नियमाचे उल्लंघन केल्यास 500 रु दंड आकारण्यात आलेला आहे.
3 . गावात कुणीही चोरून दारू विकणार नाही आढळून आणल्यास 5000 रु दंड व पोलीस कारवाई करण्यात येईल.
4. गावात४ पेक्ष्या जास्त लोक एका ठिकाणी आढळून आल्यास 100 रु दंड आकारण्यात आलेला आहे.
5 . गावातील सर्व धार्मिक स्थळे १६ तारखे पर्यंत बंद राहतील.
6 . पुणे, मुंबई ,नागपूर ,येणाऱ्या व्यक्तीना शाळेमंध्ये कोरंटाइन राहावे लागेन.
7. गावातील कोणताही व्यक्ती positive आल्यास सरकारी दवाखान्यात भरती व्हावे लागेल.
8 . कटिंग व दाडी चे दुकान बंद राहतील.
9 . कोणीही कोणाच्या घरी जाण्यास टाळावे ही नम्र विनंती.
10 . गावातून चिखलीला जाणारे सगळे वाहन बंद राहतील.
11. दुःख व दवाखान्या साठी बाहेर गावी जावे लागल्यास ग्रामपंचायत चा परवाना घ्यावा लागेल.
12 . गावात पूर्णता लॉक डाउन राहील , तसे ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका , व मदतनीस तसेच आशा या गावात फिरत राहतील जर गावामंध्ये कोणीही व्यक्ती नियमाचे उल्लंघन करत असल्याचा आढळून आल्यास त्यांना दंड आकारु शकतात,त्यांना सहकार्य करावे.त्याच्या सोबत कोणी वाद केल्यास त्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल.
13. बाहेर गावावरून येणारे फेरीवाले गावात आढळून आल्यास तात्काळ माहीत करावे ही नम्र विनंती. तसेच सांगून ऐकत नसल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल.
हे सर्व नियम गावाच्या हितासाठी लावलेले आहे त्यामुळे कोणीही उल्लंघन करू नये. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती. सरपंच समाधान रिठे ग्रामपंचायत शेलोडी यांनी केली आहे
