संदीप मस्के प्रतिनिधी देऊळगा राजा
आज चिखली नगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर सेवा विभाग च्या वतीने शहरात कोरोणा निर्मुलन व जनजागृती अभियान दिनांक 9 मे 2019 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळात राबविण्यात आले. नगरातील 9 चौक व मुख्य ठिकाणी स्वयंसेवकांनी मास्क लावून गणवेशा मध्ये हाती कोरोणा विषयी फलक घेऊन शारीरिक अंतर ठेवून लोकांना जाग्रुत केले .यामध्ये राष्ट्रीय आरोग्य भारती चे डॉक्टर जोशी ;नगर संघचालक शरद भाला ;धाड तालुका संघचालक बारस्कर सर; पर्यावरण गतिविधी प्रमुख ओमप्रकाश गोंधणे अनेक स्वयंसेवक हजर होते .सिद्ध मंदिर चौकामध्ये कुलकर्णी; भराड ,शेळके सर ,पिंपळकर सर, शेंडगे ,नामदेवराव सोलंकी तिडके व अनेक स्वयंसेवकांनी सहभाग दिला . एकूण नऊ ठिकाणी 46 स्वयंसेवक सहभागी झाले .
1)संभाजी नगर चौक
2)चिंच परिसर
3)बाबू लाल चौक
4)जयस्तंभ चौक
5)छत्रपती शिवाजी महाराज चौक
6)बसस्टँड / महाराणा प्रताप चौक
7)सिद्ध सायन्स चौक
8)B D C BANK चौक
9)राऊतवाडी स्टॉप अशा प्रकारे अभियान संपन्न झाले.
