Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखेर दिव्यांग तपासनी बोर्ड सुरु

Responsive Ad Here

 संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव

        धर्मविर सन्माननिय आमदार संजुभाव गायकवाड यांच्या सहभागामुळे शासकीय सामन्य रुग्नालय बुलढाणा येथील दिव्यांग तपासनी बोर्ड दि. 9-6- 2021 रोज बुधवार ला सुरुवात करण्यात येत आहे .

         दि . 31 /5/2021 रोज सोमवारला मा आमदार संजुभाऊ गायकवाड ' मा . जिल्हाधिकारी यांना नगर परिषद बुलढाणा दिव्यांग  मार्गदर्शन केंद्रा मार्फत व केंद्र संचालक नामदेवराव डांगरदिवे यांच्या हास्ते बुलढाणा येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील .दिव्यांग तपासणी बोर्ड ' चालू करण्यासाठी निवेदन दिले असता 'कर्तव्यदक्ष आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी दिव्यांगांचे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 'होणारी हेळसांड थांबण्यासाठी कुठलाही विलंब न लावता मा जिल्हाधिकारीयांना लेखी पत्र देऊन जिल्हा शल्य चिकित्सक . यांना विनाविलंब तपासणी बोर्ड चालू करून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात सूचित करावे .अशा आशयाचे पत्र दिले .


     मा .जिल्हाधिकारी यांनी विनाविलंब पत्राची दखल घेऊन 'जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांना तपासणी बोर्ड चालू करण्याचे सूचित केले .  त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दि09/06/2021 रोज बुधवार पासुन .तपासणी बोर्ड सुरू करण्यात यावे असे आदेश संबंधित सर्व तज्ञ डॉक्टरांना देण्यात आले .

      दिव्यांग प्रमाणपत्र हे दिव्यांगांचे जीव की प्राण आहे . दिव्यांग प्रमाणपत्र नसेल तर त्या त्रस्त दिव्यांगांचे कोणतेही काम होत नाही . गेल्या अनेक महिन्यापासून दिव्यांगांचे दिव्यांग तपासणी बोर्ड बंद होते ,त्यामुळे दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले होते . कोरूना मध्ये दिव्यांग तपासणी बोर्ड चालू कधी होणार हे माहीत नव्हते . दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यामुळे दिव्यांगांचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारे हाल  ' तसेच  प्रमाणपत्र नसल्यामुळे दिव्यांगांना अनेक सुविधा मिळत नाही हे माहित झाल्यामुळे मा . आमदार फार दुःखी झाले ' दिव्यांग सेवा ईश्वर सेवा समजून,दिव्यांगांच्या कामाला पहिले प्राधान्य देऊन अनेक महिन्यापासून बंद  असलेले दिव्यांग तपासणी बोर्ड ,फक्त चारच दिवसात चालू करून घेतले.

        फक्त  दिव्यांगांना विनंती आहे की दि .09/06/2021 ला आपण तपासणीसाठी येत असतान सर्वांनी तोंडाला मास्क लावून , हाताला सॅनी टायझर, व दोघांतील सुरक्षित अंतर ठेवून सहभागी व्हावे.शक्यतोवर कोरोणा काळात जास्त गर्दी करू नये .कोरूना चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे ,आपण स्वतः आपली काळजी घेणे आवश्यक आहे.असे दिव्यांग सेवक नामदेवराव डोंगरदिवे यांनी विनंतीपूर्वक सुचविले आहे.