Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव येथे शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक

Responsive Ad Here

  जळगाव प्रतिनिधी

     जळगाव लोकसभा शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक एका नामांकित हॉटेल मध्ये आज झाली .यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे संपर्क नेते , शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थितांना संघटना बांधणी साठी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी महाविकस आघडी सरकार स्थापने वेळेचे अनुभव कथन करत विविध पैलू उलगडून सांगितले आणि संघटनेचे महत्व पटवून दिले.तसेच शिवसेना संघटनेचा रोमांचक इतिहास देखील त्यांनी यावेळी कथन केला. 

    बाळासाहेबांची पुण्याई मोठी आहे , अवघा महाराष्ट्र त्यांच्याच पुण्याई वर चालू य. शिवसेनेचे भाग्य आहे .गेल्या पाच वर्षात शिवसेना संपाविण्याचा प्रयत्न झाला, आपण जणू गुलाम होतो, राज्याचं नेतृत्व शिवसेनेने करावं ही  शिवसैनिकाची भावना होती . आणि मुंबई कोकण नंतर शिवसेनेचा मोठा आधार म्हणजे जळगाव जिल्हा . जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत.उत्तर महाराष्ट्राच्या टेकडीवर शिवसेना भक्कम आहे.

​मंत्र्याला कमी पण शिवसैनिकाला घाबरतात . ही ताकद आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिली. तलवारीची धार म्हणजे सामना आहे. रोजचा अग्रलेख दिल्ली प्रधानमंत्री कार्यालयात भाषांतर करून पाठविले जाते. सामना ची दाखल घेतली जाते.हे संघटनेचे बळ आहे. बाळासाहेबांचा विचार यातून प्रदर्शित होतो. 

​आमचा पिंड शिवसैनिकाचा आहे ती माती घेवून आम्ही व्यासपीठ पर्यंत पोहोचलो.बाळासाहेबांनी आपल्याला जे घडवल ते आपण कुणीही विसरू शकत नाही.ती व्यक्ती नव्हती ती शक्ती बाळासाहेब नसते तर महाराष्ट्र नसता, वैभव स्वाभिमानी लढण्याची ताकद  मिळाली नसती.हिंदुत्वासाठी लढताना शिवसेनेवर दाखव झालेले खटके देखील दाखल झाले .मात्र संघटना वाढीसाठी ही लढाई कामात आली.

​लोकसभेवर देखील जळगावातील खासदार जावून भगवा फडकवा अस मला देखील वाटत.राज्याचं नेतृत्व शिवसेनेकडे असावं .. बाकी सगळ्यांना भूगोल आहे मात्र महाराष्ट्रला इतिहास आहे. कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर ,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी इतिहास घडविलाय.

​55 ची 110 करण्याची ताकद आणि भविष्यात सगळे आमदार व्यासपीठावर असतील अस स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी प्रयत्नशील रहावे. उत्तर महाराष्ट्रात आल्यावर खरच अस वाटत की खऱ्या शिवसैनिकांमध्ये आलो अशी आपुलकी वाटते .बाळासाहेबांचे आशीर्वाद या जिल्ह्याला लाभले आहेत .त्यामुळे नक्कीच जिल्ह्याच कल्याण होईल अस मला वाटत.

गुलाबराव पाटील जळगाव लोकसभेचा खासदार शिवसेना जळगाव च धुळगाव झालं होत पुन्हा जळगाव करणार राऊत साहेब आत्मविश्वास असलेले व्यक्तिमत्व लोक म्हणतात तीन तिघडा काम बिघाड पण आपण हे काम यशस्वी करून दाखवत महविकस आघाडी सरकार स्थापनेसाठी लढा दिला.