खामगाव प्रतिनिधी
खामगाव येथे समीक्षा दौऱ्याप्रसंगी प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे आवाहन
बुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पं.स.,नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी व सत्ता स्थापन करावी, त्याकरीता अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकातील जनतेला सत्ताधारी बनविण्यासाठी सुरू केलेले अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले.
वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशाने वंचीत बहुजन आघाडीचा प्रदेश कार्यकारणीचा विदर्भ दौरा अनुषंगाने खामगांव येथे बुलडाणा जिल्हा (उत्तर) ची "संघटन समीक्षा समन्वय व संवाद" बैठक प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर व प्रदेश उपाध्यक्ष गोवींद दळवी,महीला राज्य महासचिव डॉ.अरुंधती शिरसाठ, राज्य महिला उपाध्यक्ष सविता मुंढे यांचे प्रमुख उपस्थीतीत व मार्गदर्शनात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे होते तर जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, ॲड.अनिल ईखारे,महीला जिल्हाध्यक्षा विशाखा सांवंग,जेष्ठ नेते शरद वसतकर,राज्य समन्वयक डॉ.प्रा.मनोज निकाळजे ,प्रा.डॉ.राजकुमार सोनेकर,प्रा.भास्कर भोजने,ज्येष्ठ नेते रामकृष्ण रजाने, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने,भीमराव तायडे,जी.संघटक भाऊराव उमाळे,सर्वश्री जिल्हा पदाधिकारी विजय तायडे,शंकरराव इंगळे,विजय हागे,संजीव इंगळे,मनोहर सनगाळे, चंद्रभान कळंबे,रत्नाकर भिलांगे,यशवंत कळासे, तुलाशिराम वाघ,भगवान इंगळे,आत्माराम वसूलकर,प्रकाश गवई उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी बुलडाणा जिल्हा उत्तरमधुन पहिला उमेदवार निवडून देण्याचे आव्हान यावेळी पक्षकार्यकर्त्यांना केले . याप्रसंगी प्रदेश कार्यकारणीने तालुका निहाय व शहर निहाय पदाधिका-यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधुन तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे खामगाव,सुशील मोरे मलकापूर,रवींद्र भेलके संग्रामपूर,संतोष गवई जलगाव जा. दादाराव अंभोरे शेगांव, अजाबराव वाघोदे नांदुरा, तथा शहर अध्यक्ष राजेंद्र शेगोकार, धम्मपाल नितनवरे,विलास गुरव,विशाल तायडे यांच्याकडून कार्यकारणीचा अहवाल जाणुन घेतला व योग्य त्या सुचना केल्या सोबतच जिल्हा कार्यकारणीची कामगीरी तपासली. कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते .सर्व तालुका अध्यक्ष ,महिला तालुका अध्यक्ष,जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव ॲड.अनिल ईखारे तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी केले.

