जळगाव प्रतिनिधी
कॉम्रेड श्रीपत पाटील व सहकारी हुतात्मे यांना जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचा लाल सलाम
अमळनेर येथे 27 ऑगस्ट 1946 रोजी राणी लक्ष्मी बाई चौकात भरलेल्या गिरणी कामगारांच्या प्रचंड मोर्चा नंतर च्या प्रचार सभेला पोलिसांनी चहूबाजूंनी गोळीबार करून काम्रेड श्रीपत पाटील व आठ कामगारांना ठार केले. 69 कामगारांना या अंधाधुंद गोळीबारात जखमा झाल्यात. या ठार झालेल्या गिरणी कामगारांचे पुढारी कॉम्रेड श्रीपद पाटील हे मुंबई गिरणी युनियन अंमळनेर शाखेचे सेक्रेटरी होते 31ऑक्टोबर 1937 रोजी अमळनेर गिरणी कामगार युनियन ची शाखा परम पूजनीय सानेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली त्यावेळी देशातील कामगार शेतकरी किसान यांच्या चवळीला राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे आधार होता त्यावेळचे वातावरण म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे शेवटचे वर्ष .त्यावर्षीच" तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा "असे नेताजींचे भारतीय जनतेला आवाहन होते महात्मा गांधीजी गांधीजींचा इंग्रजांना भारत छोडो आंदोलनाची धार होती त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर या देशात कामगार कष्टकरी वर्गात सरकार येईल कामगारांचे हक्क शाबूत राहतील मालक शाही चे वर्चस्व राहणार नाही अन्न वस्त्र निवारा याच्या प्रश्न सुटेल जनतेचे स्वप्न होते. अशा या निर्णायक वर्षात अमळनेर मधील गिरणी कामगार राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या स्वप्नांना कवटाळून प्रताप मिल मध्ये नोकरीच्या शाश्वती साठी व स्वतःच्या उदरभरणासाठी घाम गाळत होता.
त्यावेळी गिरणी कामगार व्यवस्थापनाने शेखलाल नथू नावाचा कामगाराला कामावरून काढून टाकले त्याच्या तक्रारींची दाद लागण्यासाठी कित्येक महिने गिरणी कामगार युनियन नेकाँसिलिएशन मध्ये चर्चेत घालवले. शेवटी युनियनच्या कायद्याप्रमाणे संप पुकारला. एका खात्यात झालेल्या संपला प्रतीउत्तर म्हणून मालकांनी संबंध गिरणीच बंद ठेवून कामगारांना चिथावणी दिली कामगारांचा बशीर संप मोडून टाकण्यासा ठी तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या हुकुमावरून 144 कलमाखाली अंदाधुंद गोळीबार करून सभा होऊ न देण्याचा निर्धार केला. गोऱ्या नोकरशाहीच्या जुन्या जमानात सभा उधळून लावण्यापूर्वी पोलीस बहुतेक इशारा देत असत हवेत गोळीबार करत असत परंतु असल्या भानगडीत न पडता सरल पोलीस डीएसपी डेव्हिड यांनी अहिंसावादी कामगार वर्ग यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हिंसावादी जनरल डायर डायरीच्या कित्ता गिरवून जालियनवाला बाग सारखे अंमळनेर मध्ये हत्याकांड घडवून आणले.
27 ऑगस्ट 1946 गिरणी कामगारांवर झालेला हल्ला शहीद श्रीपत पाटील यांच्या 75 व्या स्मृती दिनाच्या नंतरही कामगार वर्गाची उपेक्षा अधिकाधिक प्रमाणात चालूच आहे. तत्कालीन कामगारविरोधी धोरणाला बळी पडलेल्या कामगारांच्या व नागरिक स्वातंत्र्याच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लालबावटा लढून आपल्या प्राणाची आहुती देणारे अमलनेरचा शूर कामगारांची p जळगाव जिल्हा कम्युनिस्ट पक्शाला व आयटक ला समता आणि बंधुत्व तत्वासाठी संघर्ष करणाऱ्या तमाम प्रागतिक परिवर्तनवादी संघटनांसाठी प्रेरणा स्त्रोत आहे कामगार वर्गाला व जनतेला जनतेला जागृत करण्याची प्रतिज्ञा आपण घेऊ या आणि सविधान बचाव देश बचाव जातीय धर्मानंद वाद मी ठेव यासाठी संघर्ष करण्याची शपथ घेऊया कॉम्रेड श्रीपाद पाटील व त्यांच्या 8 हकार्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक व तमाम कष्टकरी जनतेचे तर्फे कोटी कोटी लाल सलाम करू या .
कॉम्रेड अमृतराव महाजन (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आय टक चोपडा जिल्हा जळगाव )