Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संकुल भाडे हर्राशीत ग्रामपंचायती कडे २१ लक्ष च्या वर रक्कम जमा

Responsive Ad Here

प्रतिनिधी हिवरखेड  जितेश कारीया                 

विकास कामांसाठी रक्कम खर्च करण्याची ग्रामस्थांची मागणी

      हिवरखेड :- ग्रामपंचायत मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल च्या भाडे हर्राशीत आज ग्रामपंचायतिला २१ लक्ष रुपयाच्या वर रक्कम जमा झाली असून सदर जमा रकमेतून नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे. हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालया जवळील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज संकुल या नावाने चार गाडे बांधकाम करण्यात आले होते सदर खोल्यांचा आज हर्राशी पद्धतीने लिलाव करण्यात आला बोली बोलणाऱ्यांकडून दहा हजार रुपये घेऊन अनामत रकमेची बोली बोलण्यात आली जो अनामत रकमेची जास्त बोली बोलेल त्याला खोली भाडे तत्वाने देण्याचे ठरविल्या नंतर चार खोल्यासाठी एक ,दोन नाही तर तब्बल २१ लक्ष  ११ हजार  रुपये अनामत रकमेपोटी ग्रामपंचायत जवळ जमा झाले असून सदर रक्कम ही ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडात जमा केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायत सामान्य फंडातून अत्यावश्यकते प्रमाणे गावातील कोणतेही विकासाचे काम करता येत असल्यामुळे सदर रकमेतुन गावात विकासात्मक कामे व्हावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


       विकासाच्या दृष्टीने गावाची परिस्तिथी अत्यंत बिकट असून ठिकठिकाणी गटारे साचले आहेत बहुतांश ठिकाणचे लाईट देखील बंद आहेत तसेच गावात अनेक ठिकाणी नाली व रपटे बांधकाम करणे देखील आवश्यक असून  हर्राशीतुन ग्रामपंचायतिला प्राप्त झालेल्या रकमेतून सदर कामे व्हावीत- संदीप इंगळे, माजी सरपंच, हिवरखेड