शेख सज्जात करामत प्रतिनिधी
दि 01 ऑगस्ट 2021रोजी लोणार भारतीय स्टेट बँक चे थकबाकीदार साठी दिवाणी व फौजदारी न्यालय येथे लोक अदालत भरवण्यात आली. या अदालत मध्ये व्यापारी कर्जदार तर जास्त प्रमाणात कर्जदार असे आहे की, ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले व ते, शेतकरी बळीराजा चा कर्जमाफी झालीच नाही तरी त्या कर्ज ला चार-पाच वर्ष पूर्वी घेऊन त्याची भरणा करण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा लोणार चे
शाखाप्रबंधक स्नेहल तेलंग, यानी. न्यायालयीन वादापूर्वी निवाइयाबाबत, कर्ज खाते दाराना नोटिस देऊन त्यांना, आज दिनाक १ ऑगस्ट २०२१ सकाळी १०:३०वाजता नचुकता न्यायालयात हजर राहण्याचे सांगितले, आलेल्या खातेदाराचे तड- जोड केली असुन कर्ज कमी केले असून राहिलेल्या कर्जाला हप्ते पाडून दिले व कर्ज आपण न चुकता भरावे अशी विनंती केली. त्यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा लोणारचे शाखाप्रबंधक स्नेहल तेलंग कर्जविभागाचे सागर मावळे , हर्षल देशमुख, दर्शन ,ग्राहक सेवा केंद्र संचालक संतोष पुंड, शेख जुनेद सर ,मोरे सर ,अमोल सांगळे आदी उपस्थित असून कार्यक्रम पार पडला.
