भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
सैन्यसंख्या 1291450 माजी सैनिक उत्तमराव रामभाऊ तिडके यांचा जन्म 6 जानेवारी 1950 ला झाला 24 फेब्रुवारी 1968 ला ते सैन्यात भरती झाले व देशाच्या सर्व काना कोपऱ्यामध्ये दुर्गम स्थानामध्ये जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आर्टलरी युनिटमध्ये कर्तव्यदक्ष ड्युटी करून 31 मे 1984 ला सेवानिवृत्त झाले व तत्काळ दुसरी नोकरी म्हणून ,पुन्हा वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत बँकेमध्ये नोकरी केली. त्यांनी देशाची व समाजाची सेवा अगदी चोखपणे केली
अगदी कमी बोलणारे पण व्यवस्थित काम करणारे माजी सैनिक म्हणून त्यांची मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होती. पंधरा दिवसापूर्वी त्यांना एक अटॅक आला व जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता आज26 9 2021 ला सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली देऊळगाव राजा सिंदखेड राजा परिसरातील सर्व पंचक्रोशीतील नातेवाईक त्यांना बातमी कळताच त्यांच्या घरी शिंगणे नगर व हिंदू स्मशान भूमी मध्ये येऊन सर्व क्षेत्रातील नातेवाईकांनी मित्रपरिवाराने माजी सैनिक मित्रांनी पाण्या पावसाचे वातावरण पाहून अंत्यविधी केली . त्यांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार माजी सैनिक पत्नी सुलोचना उत्तमराव तिडके, मोठा मुलगा दिलीप उत्तमराव तिडके ,दुसरी मुलगी सुरेखा संजय जावळे, तिसरा मुलगा सुरेश उत्तमराव तिडके, चौथा मुलगा अतिश उत्तमराव तिडके टेंभुर्णी पोलीस, पाचवा मुलगा सचिन उत्तमराव तिडके जाफराबाद पोलीस मुले सुना नातवंड खूप मोठा सु शिक्षित परिवार आहे .माजी सैनिक तिडके साहेबांच्या पाठीमागे आहे खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीला जमला होता ही त्यांच्या कार्याची पावती आहे ,सर्वावर दुःख जरी कोसळ ले असले तरी वयाच्या 73 व्या वर्षी निधन हा देवाघरचा निरोप म्हणून नियतीच्या घटना मान्य कराव्या लागतात . मृत्यू एक अटळ सत्य आहे ऋषिमुनी डॉक्टर वैज्ञानिक कुणीही त्याला टाळू शकत नाही ते आटळ सत्य आहे जन्म आणि मृत्यू च्या मधला जो 73 वर्षाचा जीवन प्रवास साहेबांनी चांगल्या प्रकारे उपभोगला ,साहेब देशभक्त माजी सैनिक व शासकीय बँक कर्मचारी पेन्शन भोगी असल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून बँकेला तत्काळ पेन्शन बंद करून फॅमिली पेन्शन देण्याचा विनंती अर्ज नगरपालिकेला नोंद घेऊन तात्काळ मृत्यू दाखला च्या आठ कॉफी ओरिजनल बनवणे जिल्हा सैनिक बोर्डाकडे मृत्यूची माहिती कळवणे माजी सैनिकांची ओळखपत्रे जमा करून सैनिक पत्नीचे नावे नवीन कार्ड बनवणे आधी गोष्टीविषयी सैनिक मित्रांनी सैनिक पुत्राला कल्पना दिली .जय हिंद सैनिक डायरी क्रमश
