जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
तरुणाईचा आदर्श.अवघ्या तेविसाव्या वर्षी आपल्या देशासाठी फाशीवर जाणारा कोवळा युवक येत्या 28 सप्टेंबर रोजी भगतसिंग यांची जयंती आहे. अशा तेजस्वी व्यक्तीमत्वाच्या नावाचे अमरावती शहरात टोपे नगर (मांगीलाल प्लॉट) परिसरात शहीद भगतसिंग बालोद्यान आहे व त्या उद्यानाचे उद्घाटन भगतसिंगांचे लहान बंधू श्री.कुलबिरसिंग याच्या हस्ते 23 मार्च 1973 रोजी झाले होते.
मार्च 2021 मध्ये उद्यानाच्या दुरवस्थेबाबत मा.महापौर चेतनभाऊ गावंडे यांनी वृत्तपत्र व सोशल मीडियाची दखल घेऊन त्या उद्यानाची पाहणी करून उद्यानाच्या सुशोभिकरणाचे आदेश दिलेले होते. पण अद्यापही त्या उद्यानाला "शहीद भगतसिंग बालोद्यान" असा नामफलक लागलेला नाही. चेतनभाऊ गावंडे यांना आज परत विनंती अर्ज देऊन *भगतसिंग जयंती 28 सप्टेंबर च्या पूर्वी नामफलक लावून शहीद भगतसिंग यांचा सन्मान करावा अशी मागणी भगतसिंगप्रेमींनी केलेली आहे.

