जयकुमार बुटे /अमरावती
नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्या असता त्यांनी कर्मचारी यांचेकडून तुम्ही कोणकोणते पंचनामे केले त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली तहसील चे सर्व कर्मचारी यांचा आढावा घेण्यात आला तसेच तहसील कार्यालयाची पाहणी करण्यात आली बेंबळा प्रकल्प भागात झालेल्या कामाच्या पाहणी करत असताना येरड पुनर्वसन येथे झालेल्या निकृष्ठ दर्जाचे कामे झाली त्याचीही दखल घेण्यात येईल व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कडून जनतेच्या आरोग्याविषयी येत्या पाच दीवसात निर्णय घेण्यासाठी प्रशासक म्हणून असलेले चांदुर रेल्वे येथील एस डी ओ यांना उद्याच नगरपंचायत मध्ये मी पाठवते असे आश्वासन माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला सांगीतले तसेच पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानी बाबत पाहणी करण्याकरता आल्या असताना त्यांचेचशी नांदगाव खंडेश्वर शहराच्या बाबतीत होत असलेला निष्काळजीपणा लक्षात आणून दिला.
व ताबडतोब फवारणी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली त्याकरता पत्रकार श्री उमेश चौकडे माजी नगराध्यक्ष तथा पञकार संजय पोफळे रवी मारोडकर यांनी नांदगाव खंडेश्वर शहराच्या आरोग्याविषयी होत असलेल्या दिरंगाई बद्दल आजही भरपावसाळ्यात 5ते 7 दिवसांनी होत असलेल्या पाणी पुरवठा बाबत बांधकाम परवानगी नालीसफाई डेंगु सारख्या आजाराला थांबविण्यासाठी धुळ फवारणी ईत्यादी कामे प्राधान्याने सोडवावी यासाठी विनंती केली वेळ वेळकाढूपणा करत असलेल्या मुख्याधिकारी यांचे विषयी नाराजी व्यक्त करून होत असलेल्या कामाच्या दिरंगाईबद्दल समस्यांचा पाढा वाचला
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री नितीनजी व्यवहारे, नांदगाव खंडेश्वर चे तहसीलदार श्री पुरुषोत्तमजी भुसारी नायब तहसीलदार राठोड साहेब वासनिक साहेब सहारे साहेब हे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच नांदगाव खंडेश्वर तहसील चे बरेच भागाचे तलाठी ,मंडळ अधिकारी तहसीलचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
