गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथे आज दि १६/९/२१ रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा संघटना मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ५जुन२०२० रोजी केंद्रसरकार ने म्हणजेच भाजप सरकारने तिन नविन कृषि कायद्याचा आद्यादेश काढला, ते तिन आद्यादेश शेतकरी वर्गाची पिळवणूक करणारे असुन लक्षात आल्याचे समजल्यास पंजाब हरियाणा येथील शेतकरी संघटनांनी आंदोलन केले, पण केंद्रसरकार हे अध्यादेश मागे घेत नसल्याने गेली वर्ष भरात दर महिन्याला निवेदन पुर्ण भारतात राष्ट्रीय किसान मोर्चा कडुन दिले जात आहेत.
तरी प्रशासनाने याची गंभीरता घ्यावी असे निवेदनातून देण्यात आले,तसेच obc राजकिय आरक्षण व शैक्षणिक आरक्षणाचे निवेदन देण्यात येणार आहेत, निवेदन देतांना संघटनाचे ता, अध्यक्ष प्रकाश शिंदे , सह सचीव कविराज पाटील, राजेंद्र खैरनार, हेमंत महाजन, व शेतकरी उपस्थीत होते.
