प्रतिनिधी येवला
तरुणाईच्या सक्रिय सहभागामुळे विक्रमी ३८५ जणांचे लसीकरण
येवला तालुक्यातील नेऊरगाव येथे कोवीड लसीकरण मोहिम उत्साहात संपन्न झाली.नेऊरगाव तसेच परिसरातील १८ वर्षापुढील वयोगटातील नागरिकांचा लसीकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
गावातील तरुणांनी तसेच खास करुन संगणक परिचालक प्रविण कदम, ग्रा.पं कर्मचारी सुभाष कदम ,आदित्य कदम,आणि नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक रविंद्र बिडवे,समाधान कदम यांनी ऑनलाईन नोंदणी साठी विशेष सहकार्य केल्यामुळेच आज ३८५ जणांचे लसीकरण शक्य झाले
असे प्रतिपादन समुदेय आरोग्य अधिकारी ज्योती वाघ यांनी केले.यावेळी आरोग्य सेवक गणेश ठेगडे,आरोग्य परिचारिका पुजा नेतकर ,शोभा शिर्के,आशा स्वयंसेविका सुनीता कदम,आशा कदम,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
