Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माती परिक्षण प्रात्यक्षिकाचे कृषीदुतानी केले सादरीकरण

Responsive Ad Here

प्रतिनिधी येवला

         ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत  के के वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी  जळगाव (नेऊर) ता.येवला येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करुन शेतकरी माती परिक्षणाचे महत्व शेतकरी बंधुना पटवुन दिले.

    रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर व त्यातुन  जमीनाचा सुपीकता कमी होऊन शेतकरी बंधुच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण संबंधी जनजागृती व्हावी माती परिक्षणाचे सादरीकरण कृषीदुतांनी केले. यामध्ये  मातीचा नमुना कसा घ्यावा किती दिवसांनी घ्यावी याची सखोल माहिती तसेच माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन कसे करावे याचा सल्ला कृषीदूतांनी  शेतकऱ्यांना दिला. 

     यावेळी  आकाश शिंदे व ओंकार शिंदे या कृषी दूतांनी मार्गदर्शन केले व त्यांना  उपक्रमासाठी कृषी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, व प्रा.सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी वसंत शिंदे ,आनंदा शिंदे, दगू दाते, रघुनाथ शिंदे, किसन दाते, रंगनाथ काकड, विशाल शिंदे, रंगनाथ शिंदे, धनेश शिंदे दिपक दाते,अमोल शिंदे व जळगाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.