Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात निघाला विराट आसूड मोर्चा शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

Responsive Ad Here

जळगाव जामोद प्रतिनिधी

 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तसेच ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी जळगाव जामोद मतदारसंघ व हजारो शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा जळगाव जामोद येथे काल 26 ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालयावर धडकला. हा मोर्चा दुपारी 2 वाजेच्या दरम्यान राठी जिनिंग पासून, चौभारा चौक, दुर्गा चौक मार्गे काढण्यात आला या मोर्चामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग होता. महा विकास आघाडी सरकारने 2019 व 20 च्या पीक विमा मध्ये भेदभाव केला व शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले तसेच चालू वर्षाचा पिक विमा कुठलाही भेदभाव न करता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा .

तसेच ओला दुष्काळ निधी हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी त्याचप्रमाणे आज पर्यंत थकित असलेले कर्ज माफ करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय काढण्यात आला.  या मोर्चाला संबोधित करताना डॉक्टर संजय कुटे म्हणाले की महा विकास आघाडीचे सरकार आल्या बरोबर त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला पिक विमा बद्दल कृषिमंत्री, अशोक चव्हाण तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला कुठेही बोलवावे त्यांना उघडे  पाडल्याशिवाय राहणार नाही असे चॅलेंज देखील दिले. आपण प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि हे काम करत असताना आम्हाला कर्तव्याची जाणीव  करून देण्याची हिम्मत  करू नये तसेच विरोधकांनी आमदाराच्या घरावर मोर्चा काढण्यापेक्षा मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीवर  मोर्चा नाही काढला असा खोचक सवाल देखील त्यांनी यावेळी केला. आज महाविकासआघाडी सत्तेमध्ये आहे.



 आम्ही सत्तेत असताना आम्ही कधी मोर्चे नाही काढले तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठोस निर्णय घेतले विरोधक सत्तेत असून ते जनतेची फसवणूक करत आहेत सप्ता असल्यावर लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात.  पुढे बोलताना 2017-18 मध्ये 13 तालुके दुष्काळी घोषित करून सरसकट हेक्टरी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला लावली होती जेव्हा जेव्हा ेतकर्‍यांवर संकट आले त्यावेळी आम्ही कधीही केंद्राची वाट पाहिली नाही स्वतःच्या भरोशावर सरकार चालून तात्काळ मदत जाहीर केल्या तसेच 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद दिला आणि भाजप सरकारला दिलेला हा आशीर्वाद काही करंट्या लोकांनी हिरावून नेला.

 महाविकास आघाडी सरकार येण्याआधी  दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यात त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेने शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापण्याची थांबावे जर हे थांबत नसतील तर जनतेची जाहीर माफी मागावी तसेच मातोश्रीवर तसेच वर्षावर दिवा न लावता अंधारात दिवाळी साजरी करावी असे सांगितले या मोर्चामध्ये जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य तसेच सर्व आघाड्यांचे मोर्चा व सेलचे अध्यक्ष शहर तालुका जिल्हा महिला आघाडी सर्व शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख सर्व पत्रकार सह हजार शेतकरी उपस्थित होते.