Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भगवानबाबा महाविद्यालय लोणार येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न

Responsive Ad Here

मो.असलम  तालुका लोणार प्रतिनिधी


"महाविद्यालयीन विद्यार्थी सोबत प्राध्यापकांनी केले आपले लसीकरण

     स्थानिक भगवानबाबा महाविद्यालय येथे दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजे पर्यंत ग्रामीण रुग्णालय लोणार व भगवानबाबा महाविद्यालय संचालक मंडळाच्या संयुक्त  विद्यमानाने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थी सोबतच प्राध्यापकांनी सुद्धा आपले लसीकरणाच्या उर्वरित डोस पूर्ण केले.

                     लोणार येथे  सातत्याने सुरू असणाऱ्या लसीकरणाचा लाभ सर्व नागरिक नियमितपणे घेत आहे. आता ग्रामीण रुग्णालय लोणार नी *"लस आपल्या दारी"* हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे, याचाच भाग म्हणून लोणार शहरातील व ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष कोरोनाचे शिबीर आयोजन करण्याचे काम सुरू आहे. मागील आठवड्यामध्ये असे लसीकरण शिबीर बनमेरू महाविद्यालय लोणार येथे आयोजित करण्यात आले होते व आज भगवान बाबा महाविद्यालय येथे हा लसीकरण शिबिर यशस्वीपणे संपन्न झाला. सर्व विद्यार्थी व प्राध्यापकानी आपले लसीकरण या शिबिरामध्ये पूर्ण करून शिबिराला सकारात्मक प्रतिसाद दिला.

   


                  कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य श्री बडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक  आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बडे सर यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये   कोरोणाचे साकडे ब्रेक करण्यामध्ये लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. सर्वांनी या लसीकरण शिबिरा द्वारे आपले लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फिरोज शहा यांनी या वेळी केले. या आव्हानाला विद्यार्थी व प्राध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व या एकाच दिवसात  महाविद्यालयाचे तब्बल १२० विद्यार्थ्यांनी लसीकरण करून आपला प्रतिसाद नोंदविला.

                  कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता भगवान बाबा महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने लसीकरणाचे टीममध्ये आरोग्य अधीक्षक डॉक्टर फिरोजशहा, वैद्यकीय अधिकारी निखिल अग्रवाल, डॉक्टर कविता मापारी, लस  टोचक श्रीमती वैशाली पाडळे, श्रीमती वंदना घुगे, नरवाडे, डाटा एंट्री ऑपरेटर विष्णु खरात, अरुण  नागरगोजे, वाहन चालक बापू देशमुख इत्यादींचा समावेश होता.