जामनेर प्रतिनिधी
पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ सागर गरुड यांची जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र गरुड यांना देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना डॉ सागर गरुड यांनी सांगितले की पाचोरा येथील रुग्णालयात शासनाच्या विविध योजनांचा आरोग्य विषयक लाभ रुग्णांना मिळत आहे .
| डा.सागर गरूड याना नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व इतर |
मोठ्या प्रमाणात उपचार व शस्त्रक्रिया तेथे मोफत होतात .यापुढे जिल्हाभरात शासकीय व खाजगी रुग्ण सेवेच्या माध्यमातून तसेच विविध आरोग्य विषयक शिबिरे सुरू करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे .या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ,मंत्री धनंजय मुंडे व जामनेर सोयगाव तालुक्यातून पंकज पाटील, शंतनू गरुड, संभाजी पाटील, वेदांत पाटील, युवक कार्याध्यक्ष निलेश साबळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.