Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शाळेच्या पहिल्या दिवशी झाले गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल येथील रा. ति.काबरे विद्यालयात 4 ऑक्टोबर सोमवार पासून 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले.शासन आदेशानुसार 8 वी ते 12 वीं ची शाळा सुरू करण्यात आली . विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयात स्वागत करण्यात आले . शालेय पोषण आहार अधिक्षक एस.एच. न्याहळदे , शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील तसेच बी आर सी . च्या भावे मॅडम यांनी शाळेस भेट दिली . 


वरील मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.एस.मानुधने , उपमुख्याध्यापिका एस . ए.पाटील , पर्यवेक्षक ए . आर मालू  , एन . एन . डागा सर यांनी केला .मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सीजन मोजण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांना सॅनीटायझर देऊन वर्गात सोडण्यात आले . आज एकूण 323 विद्यार्थी व 48 शिक्षक वृ 48 उपस्थित होते . शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला .