भिमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
मृत्यू एक अटळ सत्य आहे ऋषीमुनी तांत्रिक-मांत्रिक डॉक्टर वैज्ञानिक यांनाही चुकत नाही ही परंतु पुण्यतिथीचे महत्त्व आहे.
वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर नाम प्रचारक म्हणून अविरत साधकांची त्यांनी सेवा केली.
महा मुख्य विष्णू चैतन्याचे मूळ ! आनंद संप्रदाय तेथोनिया !!
श्रीपाद बाबा रामदास बाबा यांचे अनुयायी भगवान बाबा शिंदे यांचे गुरुबंधू मारुती बाबा दंदाले यांचा जन्म 1960 मध्ये झाला व आज30 सप्टेंबर 20 21 ला सकाळी साडेसहा वाजता गुरुवारी गुरु पुष्य अमृत योग दिवसाचे औचित्य साधून दंदाले बाबांनी देह ठेवला . दोन दिवसापूर्वी हिंदू-मुस्लीम जातीय सलोखा वृद्धिंगत करणारे हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराज अगदी ज्याप्रमाणे कीर्तनात नामचिंतनात गेले त्याच प्रमाणे ,जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे .
गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. अर्थातच नामक कृपा करणे ही उत्तम आहे
आणि याच *गुरु पुष्य अमृत दिवसावर हरी भक्त पारायण मारुती बाबा दंदाले खल्याळ गव्हाण देऊळगाव राजा यांनी देह ठेवला.* ही बातमी महाराष्ट्रभरातील साधकांना कळल्यानंतर खल्याळ गव्हाण गावाला यात्रेचे स्वरूप आले आणि गावातील लोकांना कळले की बाबा काय होते महाराष्ट्रभरातून गाड्या येऊ लागल्या घरासमोर शोभायात्रेची तयारी सुरू झाली दिवसभर भजन नामजप नाम चिंतन करणारे साधक बंधू-भगिनी दूर दूर वरून आले प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार यांची नाव घेणार नाही सर्व हरी भक्त पारायण खामगाव अकोला चिखली बुलढाणा देऊळगाव कोळ देऊळगाव मही मेव्हणा राजा देऊळगाव राजा जालना औरंगाबाद लातूर परभणी धर्माबाद आंध्र प्रदेशातून बाबांचे साधक परिवारातून वाल्हयाचे वाल्मिकी बनलेले भक्तगण आले होते. बाबांच्या पार्थिवाला पंचामृताने स्नान घालून, फेटा बांधून त्यांना फुलारणी सजवले ,भजनाच्या गजरात दोन्ही तर्फे रांगोळी काढलेल्या रस्त्यावर बाबांची शोभायात्रा काढण्यात आली.
खल्याळ गव्हाण गावांच्या हिंदू स्मशान भूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. बाबांच्या पाठीमागे आई शांताबाई कडुबा दंदाले, मोठा मुलगा विनोद मारुती दंदाले मुंबई ,दत्तात्रय मारुती दंदाले जळगाव, व वैजनाथ मारुती दंदाले मुलगी रेणुका मस्के, गुरु माता गंगूबाई मारुती दंदाले व बाबांचे दोन भाऊ रामदास कडुबा दंदाले परमेश्वर कडुबा दंदाले बाबांच्या बहिणी गोदावरी सरोदे व कावेरी गरड मुली सुना नातवंडे हा रक्ताचा परिवार आहे .परंतु यापेक्षाही मोठा साधक परिवार बाबाच्या शोभायात्रेत महाराष्ट्रभरातून हजर होता तेव्हा गावकऱ्यांनी बाबा ची खरी महती जाणली, गटारीत पडलेल्यांना बाबा उचलून घ्यायचेच आणि त्यांच्या परिवाराला सुधारावयाचे.त्यांच्या मुलींचे स्थळ बघून आणायचे नाम चिंतनाची गोडी लावायची आणि साधकांना बोलकं करायचं हे त्यांचं कार्य महाराष्ट्रभर चालू होतं. आणि आज अनेक साधकांनी त्यांच्या विषयीचा अनुभव प्रतिक्रिया यावेळी थोडक्यात मांडण्यात आल्या आणि बाबा मुळे आमची संसार कसे सुरळीत चालले हे साधकांनी सांगितले .ग्रामपंचायत ने उशीर झाल्यामुळे लाईटची व्यवस्था आणि साऊंड सिस्टम ची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती रात्री उशिरा आठ वाजता पसायदान घेऊन सर्वांनी हरिभक्त पारायण मारुती बाबा दंदाले यांना श्रद्धांजली वाहिली 80 5556 8866 नंबर वर एक साधकाकडे वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बाबा दंदाले यांचे शोभायात्रेचे व्हिडीओ चित्रीकरण भेटेल
