Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या राज्य सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Responsive Ad Here

जळगाव दि, प्रतिनिधि

कोरोना काळात रुग्णालयांचे बिल भरुन शेतकरी आर्थिक दृष्टया कमकुवत झाला आहे. तसेच विज कंपनीचा गलथान कारभार , सातत्याने रोहित्र फेल होण.रोहित्र मिळणेस विलंब होणे, विलंबाने मिळालेले रोहित्र नादुरूस्त निघणे, कमी दाबाने विज पुरवठा होणे यांसारख्या तक्रारीने शेतकरी कमालीचेहवालदील झालेले आहेत.

या वर्षीच्या हंगामात जिरायती पिके ,कापुस सोयाबीन ,मका, कडधान्य व बागायती पिके केळी ,फळबाग या पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला

हंगाम नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आस लागलेली आहे. वर्षी पाऊस मोठया प्रमाणावर झाल्यामुळे नदी, नाले , तलाव , विहीरी तुडुंब भरलेल्या आहेत.असे असतांना शासनाने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे विज कनेक्शन कट करण्याचे आदेश काढलेले आहेत.

विज बिल भरण्याची सक्ती केली जात आहे. हे निर्णय शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे कि मरावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोना सारखी वैश्विक महामारी व आस्मानी संकट यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. करिता निद्रास्थ असलेल्या शासनाचे डोळे उघडण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचे आयोजन उद्या रोजी करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे खासदार उमेश पाटील खासदार रक्षाताई खडसे आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण आमदार चंदुलाल पटेल स्मिता वाघ अशोक  कांडेलकर  सुरेश धनके किसान मोर्चाचे पोपटतात्या भोळे नारायण चौधरी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना ताई पाटील लालचंद पाटील भाजपा व किसान मोर्चा करणार आहे