Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सलग नऊ वर्षापासून होत आहे रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

Responsive Ad Here

मोहम्मद असलम परवेज लोणार तालुका प्रतिनिधी


सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान:  मिलादुन्नबीचे औचित्य साधून लोणार येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

     लोणार येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जमियते उलमा ए हिंद शाखा लोणारच्या वतीने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जामा मस्जिद चौक लोणार येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोणार शहराचे प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाश भाऊ मापारी, हाजी महेमुद सेठ तसेच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.                         


  मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जग पातळीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तसेच वेगवेगळे उपक्रम व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून लोणार येथे सलग ९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये हिंदू-मुस्लिम तसेच इतर सर्व धर्माच्या लोकांनी बहुसंख्येने रक्तदान करून गरजू पर्यंत आपला रक्त पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. वृत्त  लिहीपर्यंत ७२ लोकांनी आपले रक्तदान करून याला यशस्वी केल्याची माहिती श्री मो.रिजवान जड्डा (अध्यक्ष जमियते उलमा) लोणार यांनी दिली.

                   सध्या कोरोणाच्या या कठिण काळामध्ये सर्वत्र रक्ताचा साठा अत्यल्प असून संपूर्ण महाराष्ट्राला रक्ताची नितांत गरज आहे.  सर्वत्र रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन सर्व सामाजिक राजकीय व धार्मिक संघटनांशी केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार फक्त बुलढाणा जिल्ह्यात एका महिन्याला तब्बल २०० ते २५० रक्तपिशव्याची गरज असते मात्र सध्या शासकीय रक्तपेढीत केवळ २२ रक्त पिशव्या उपलब्ध आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हीच परिस्थिती असून रक्ताचा किती तुटवडा निर्माण झालेला आहे याची कल्पना करू शकतो. तरी सर्वांनी आपले अमूल्य रक्तदान करावे असे आवाहन यावेळी जमियत उलमा ए हिंद च्या वतीने करण्यात आले.

                       या कार्यक्रमाला तहसीलदार सैफन नदाफ, आरोग्य अधिकारी फिरोज शाह, न.प.अध्यक्ष श्री. पाटोळे, माधवराव मापारी, रौनक अली, बिलाल सेठ, हाजी मसूद सेठ, डि.एन पठाण साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद, निसार शेख सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर  कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जमिअते उलमाए हिंद शाखा लोणार च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यामध्ये श्री रिजवान जड्डा, मौलाना तारीक, शहराध्यक्ष हाफिज शेख अयाज, रिजवान खान करामत खान,वसिफ अहमद खान, इजहार खान, जफर भाई, फिरोज पठाण, अन्नुसर, डॉक्टर ताहेर,शमसुद्दीन सर, शेख सोहील, फरजीन अहमद व  इतर सर्व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाला यशस्वी केले.


प्रतिक्रिया

"जर रक्तपेढीतच रक्त उपलब्ध नसेल तर रुग्णांना ते कसा उपलब्ध करून देता येईल? शासकीय रक्तपेढी बरोबरच खाजगी रक्तपेढीची ही हीच परिस्थिती असल्याची माहिती आहे. तरी सर्व माध्यमांनी आपल्या परीने विविध कार्यक्रमाच्या अवसरवर रक्तदान शिबिराचे आयोजन करून भारतभर मध्ये रक्तपुरवठा उपलब्ध करण्यामध्ये आपला वाटा लावावे."-मोहम्मद रिजवान जडडा* अध्यक्ष, जमीयते उलमाए हिंद, लोणार