१ वाळू घाटांत पाणीसाठा : १ वाळुघाट अंतर कमीमुळे रद्द ; ७ वाळुघाट लिलाव प्रक्रियेत
तळणी : पूर्णा नदीपात्रातील १६ वाळू घाटापैकी ९ वाळू पट्टे लिलाव प्रक्रियेत असून या लिलावासाठी १६ नोव्हेंबर रोजीच्या ग्रा. पं. सभेतील ठरावाची गरज आहे. या सर्वेक्षणात एका वाळूघाटात पाणी साठा तर दोन वाळुघाटातील अंतर कमी असल्याने एका वाळुघाट रद्द होईल, असे १४ नोव्हेंबर रोजीच्या सर्वेक्षणात अहवालात तहसील प्रशासनाने म्हटले आहे. मात्र , मागील वर्षी लिलावानंतर महसूलचा "अर्थपुर्ण" दुर्लक्षामुळे संबंधित गुत्तेदाराकडून नियमबाह्य व अतिरिक्त उत्खनन झाल्याचे समोर आल्याने लिलावासाठी पर्यावरण प्रेमीकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील भूवन - शिरपूर , टाकळखोपा - दुधा , इंचा - सासखेडा , कानडी - लिबंखेडा, कानडी- उस्वद २ , देवठाणा- उस्वद १ , देवठाणा- उस्वद २ , देवठाणा- उस्वद ३, देवठाणा - उस्वद- खोरवड हे वाळू घाट उत्खननासाठी लिलाव प्रक्रियेत आहेत. देवठाणा - उस्वद- खोरवड या वाळूघाटात पाणी असून इतर वाळघाट व देवठाणा- उस्वद १ या वाळुघाटामध्ये अंतर कमी असल्याने रद्द होईल , यावर्षी लिलाव प्रक्रियेनंतर वाळुघाटातून नियमानुसार वाळु उत्खनन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे . त्यामुळे पुढील प्रशासकीय कारवाईकडे लक्ष लागले आहे.
लिलावानंतर अतिरिक्त उत्खनन रोखण्याची गरज
'पूर्णा 'नदीपात्रातील वाळघाट लिलावानंतर नियमबाह्य व अतिरिक्त उत्खननाला आळा घालण्यासाठी जालना जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, जालन्याचे निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके , परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी व्यक्तिगत लक्ष देण्याची गरज आहे.
तीनही कोल्हापूरी बंधारे फुटल्याने वाळुचोरी वाढली ...
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील देवठाणा- उस्वद , पूर्णा पाटी व वाघाळा येथील कोल्हापूरी बंधारे फुटलेले असल्यामूळे नदीपात्रात पाणीसाठा राहत नाही. याचा फायदा स्थानिक ट्रॅक्टर व टेम्पोधारक थेट नदीपात्रातून वाळु चोरी करतात.
लिलावासाठी ग्रा. पं. ठराव गरजेचे - चिचोले
याबाबत उस्वद , तळणी व शिरपूर सज्जाचे तलाठी नितीन चिचोले यांना विचारले असता, ' पूर्णा 'तील ९ वाळूघाटाचे नुकतेच सर्वेक्षण केले असून सदर वाळुघाट लिलावासाठी १६ नोव्हेंबर रोजी च्या ग्रा. पं. सभेतील ठराव महत्त्वाचे आहेत.