जामनेर प्रतिनिधी
पहुर. ता.जामनेर-त्रिपुरात घडलेल्या हिंसेचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमटले. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर महाराष्ट्र पोलिस सतर्क झाली आहे. इतर ठिकाणी हिंसेच्या निषेधार्थ विपरीत घटना घडू नये याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली आहे
यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रविण साळुंखे हे जळगाव येथे तळ ठोकून आहेत. त्यांच्या आदेशानुसार पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात जाऊन मोहल्ला मिंटिग व बसस्थानक परिसरात नागरिकांना जमवून तसेच गावात पोलिस वाहनाने ध्वनिक्षेपकाव्दारे नागरिकांना शांतता राखण्यासाठी आवाहन करीत आहे. व्हाट्सएप धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट करु नये किंवा शेयर करु नये तसेच अफवा पसरवून शांततेचा भंग करु नये. असे कोणी करत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी. पोलिसांची सायबर यत्रंणा अशा पोस्ट करणाऱ्या वर लक्ष ठेवून आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सतर्क तेचे आवाहन करण्यात येत आहे.