गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
न.पा.तर्फे रोज " स्वच्छ एरंडोल सुंदर एरंडोल " हि स्वच्छता मोहित सुरु आहे तरी शहरातील काही प्रभागात आजही रहिवाशांकडून वारंवार स्वच्छतेची मागणी होत आहे.त्यातीलच एक भाग म्हणजे गांधीपुरा भागातील रमाबाई आंबेडकर नगर याठिकाणी असलेल्या ठिकाणी मोकळ्या भूखंडावर कुंभार समाज व बौद्ध समाज बांधवांनी नियोजित समाज मंदिर जागेसाठी एरंडोल.न.पा कडे ५ -६ वर्षापासून मागणी मागील केली आहे तरी याकडे एरंडोल न.पा.ने दुर्लक्ष केले असल्याचे व त्या मोकळ्या प्रस्तावित भूखंडावर घाणिचे साम्राज्य होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा,उंच काटेरी झाडे, घरातील टाकाऊपदार्थ,अविघटनशील घटक व उघड्यावरील फिरणारे कुत्रे, डुकरे, यांचे अधिक वास्तव्य त्या ठिकाणी झाले .
असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.यामुळे सणासुदाच्या उबंरठ्यावर रोगराईचे प्रमाण अधिक वाढू शकते.व स्थानिक सामान्य नागारिंकाना या समस्यांना सामोरे जावे लागेल अशी भीती देखील रहिवाशांनी व्यक्त केली आहे तरी एरंडोल न.पा.ने त्वरीत याकडे लक्ष देवून स्वच्छता करुन द्यावी असे निवेदन रमाबाई आंबेडकर बहुद्देशीय संस्था मार्फत एरंडोल न.पा.ला देण्यात आले आहे.✍️