एरंडोल प्रतिनिधी गणेश महाजन
म्हस्वाद नाक्यावरील मटन मार्केट की...
कुत्रे, डूकरांचा मुक्त संचार-संताप
एक कदम स्वच्छता की ओर... स्वच्छतेचे 3 स्टार मिळालेल्या एरंडोल नपाचा गौरव झाला खरा परंतू प्रत्यक्षात काय ? असा संतप्त सवाल नागरीकांनी केला असून म्हसावद नाक्यावरील मटन मार्केट की... आणखी काही, गटारींमधील घाण, दुर्गंधी, कुत्रे, डूकरांचा मुक्त संचार पाहून नागरीकांचा संताप तर होतोच, अनेकवेळा तेथील मटन मार्केट विक्रेत्यांनी तक्रारी करून देखील एकच दिवस स्वच्छता मग पुन्हा तेच... तेच... यास म्हणावे तरी काय ?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देवून त्यादृष्टीने 3/4 वर्षांपासून कठोर पावले देखील उचलली, भरमसाठ निधी देखील दिला परंतू कसले काय नी फाटक्यात पाय.... फक्त चमकोगिरीच... एरंडोल नपाला स्वच्छतेचा देशपातळीवरील म्हणा अथवा काहीही म्हणा 3 स्टारचे बक्षिस मिळाले, वृत्तपत्रांमधून फोटोसह वृत्त देखील झळकले. परंतू प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच वारे वा....
नागरीकांच्या मागणीनुसार शासनाने निधी दिला. मटन मार्केट स्वतंत्र बांधून दिले परंतू स्वच्छतेचे मात्र नेहमीच तीन तेरा... गटारीत घाण, कचरा यामुळे दुर्गंधीने हैराण त्यामुळे मोकाट डूकरे, कुत्रे यांचा सर्रास वावर. परिणामी मटन खाणारे देखील कमी झाल्याने विखरण अथवा निखील पेट्रोल पंपासमोर म्हणजेच तालूका क्रिडा संकूल (ते देखील अवैध धंद्याचे केंद्रच) च्या गेटजवळच उघड्यावर मटन विक्री केली जाते तेथून आणले जाते यास म्हणावे तरी काय ? सध्या नपास कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लाभले असून त्यांनी मटन मार्केटची दुरावस्था पहावी हीच यानिमित्ताने अपेक्षा. तोपर्यंत उघडा डोळे... बघा नीट... एवढेच.