Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश

Responsive Ad Here

प्रतिनिधी/भरत जोगदंडे

चिखली/ सामाजिक बांधिलकीची जोपासना करण्यात कटीबद्ध असनारे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या नेतृत्वाखाली विविध जाती धर्माचे लोक रिपब्लिकन पक्षामध्ये सहभागी होत आहेत. याच धर्तीवर आज दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सामील झाले आहेत.  सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब, लोकनेते विजयदादा वाकोडे, विदर्भ अध्यक्ष योगेन्द्र चवरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मुजीब पठाण, युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे, युवा प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई  यांचे वतीने कार्यकर्त्यांचे मान समान करुन स्वागत करण्यात आले. 


बुलढाणा जिल्हाउपाध्यक्ष ब्रह्मभाऊ साळवे यांनी सांगितले की, चिखली तालुक्यातील पक्षसंघटना वाढीसाठी सर्वानी एकजुटीने काम केले पाहिजे . या वेळी उपस्थिती मध्ये बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष सलीमभाई  , जिल्हा सचिव सत्य कुटे,युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, युवा चिखली शहराध्यक्ष शेख मालिक, युवा चिखली शहर उपाध्यक्ष अप्पू खान, नितीन माघाडे उपस्थित होते. आज झालेल्या नियुक्ती मध्ये श्याम लहाने यांची चिखली तालुका कार्याध्यक्षपदी तर अरुण जाधव चिखली तालुका संघटकपदी तसेच अमोल जाधव युवा तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते