Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार शहरातील चार मजली कापड केंद्र जळून खाक!

Responsive Ad Here

मोहम्मद असलम परवेज



लोणार :       शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड केंद्रला रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात चार मजली विनायक कापड केंद्र पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली.  जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका दुकानातून धूर निघत असल्याचे रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. दरम्यान, नेमका प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची तेथे गर्दी होत असतानाच आगीने कापड केंद्राच्या चार मजल्यावर रौद्ररूप धारण केले. या आगी च्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


               आगीची माहिती लोणार नगर पालिका व पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर अग्निशमन दलासही तेथे पाचारण करण्यात आले. लोणार, चिखली आणि मेहकर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. ही आग सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू होती.  या परिसरातील लोणी रोड वर असलेले  तीन दुकाने २ मार्च २०२१ रोजी जळून खाक झाल्याची घटना घडली होती तसेच त्याच परिसरात अकोला जनता  बँकेला आग लागली होती. मागील दोन वर्षापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाच ते सहा आगीच्या मोठ-मोठी घटना  झाले आहे.
                बस स्टॅन्ड परिसरातील शहराचा मुख्य बाजारपेठ आहे दुकानाला आग लागण्याच्या घटना सतत घडत असल्याने व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचे पाहणी करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, संतोषराव मापारी, डॉ.अनिल मापारी तसेच लोणार मेहकर परिसरातील पदाधिकारी सामाजिक संघटना आणि नागरिक उपस्थित होते.