Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पत्रकार बांधवांच्या न्याय हक्का साठी लोकशाही मराठी पत्रकार संघ तत्पर- सचिन बोंबले

Responsive Ad Here

वंदना  गवई प्रतिनिधि जिल्हा 

लोकशाही मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

चिखली:- तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील  सेवा संकल्प ला भेट देण्याच्या निमित्ताने लोकशाही मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न या सर्व प्रथम सेवा संकल्पला भेट दिली असता नंदकिशोर पालवे यांच्या कार्याने सर्व पदाधिकारी भारावुन गेले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बैठकीचे अध्यक्ष लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले पाटील तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील संग्राम पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती जालना जिल्हा अध्यक्ष विजय खरात बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा प्रवीण कुमार काकडे जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत जैवाळ हे होते.


         पत्रकारिता क्षेत्रामध्ये चॅनल व पेपर च्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक न्याय देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघ हा तत्पर असल्याचे मत प्रदेश अध्यक्ष सचिन बोंबले यांनी व्यक्त केले तसेच लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जे पत्रकार बांधव आपल्या संघाशी जुडतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सदैव पाठीशी राहणार असे मत प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले यावेळी दशरथ सुरडकर यांनी लोकशाही मराठी पत्रकार संघ हा पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी कशाप्रकारे सक्षम राहिल याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांचे समयोचित भाषणे झाली सदर कार्यक्रमाचे आयोजन चिखली तालुका संपर्कप्रमुख चंद्रकिशोर काळे यांनी केले होते यावेळी जिल्ह्याचे व तालुक्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आदिल पठाण  जिल्हा महासचिव जिशान आफताब खान तर खामगाव तालुका अध्यक्ष म्हणून संतोष धुरंधर उपाध्यक्ष वैभव देशमुख देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष म्हणून अमोल हरणे मेहकर तालुका संपर्कप्रमुख शिवाजी मोरे यांच्यासह  इतर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष संदीप सावळे पाटील उपाध्यक्षा वंदना गवई सचिव रवी मगर सहसचिव उमा सुरडकर सदस्य कल्पनाताई केजकर मेघा जाधव कोषाध्यक्ष अजहर शेख सहसंघटक समाधान वानखडे सहकोषाध्यक्ष दिलीप हतागळे सदस्य सिध्दार्थ वानखडे निलेश कोल्हे प्रकाश जेऊघाले जाफ्राबाद तालुका अध्यक्ष नंदकिशोर काळे जिल्हा उपाध्यक्ष जालना शेख साबीर राजीव जाधव चंद्रभान झिने यांच्यासह अनेक पत्रकार बांधव व भगीणी उपस्थित होते.