Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गुटखा विक्री प्रकरणी चोहोट्टा बाजार येथील किराणा व्यापाऱ्यास अटक

Responsive Ad Here

अकोला प्रतिनिधि 

 जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार ता. अकोट येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पानमसाला,सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी. खर्रा) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर बुधवारी (दि.२९)  कारवाई करुन अटक करण्यात आली. या व्यापाऱ्या विरुद्ध  दहिहांडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सा. द. तेरकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मे. शाहिद किराणा, मेन रोड, चोहट्टा बाजार, ता. अकोट, जि. अकोला येथे बुधवारी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी धाड टाकली. या दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत होती असेच प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत ८७९० रुपये इतकी आहे. 

याप्रकरणी दुकानाचा मालक शेख शहीद शेख इसहाक यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२),(i),२६(२)(iv) तसेच भादंवि कलम  ३२८, १८८, २७२, २७३ नुसार दहिहांडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली असून कार्यवाहीत कार्यालयाचे नमुना सहायक बी. एच. नरवणे हे सहभागी होते.