मो.असलम परवेज, लोणार
"नगरपालिका मधील शिक्षकांनी केला दिल्ली शाळांचा अभ्यास दौरा"
नववर्षाच्या औचित्य साधून पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वा. नगर परिषद उर्दु पूर्व माध्यमिक डिजिटल शाळा, काटे नगर लोणार येथे शिक्षण विभागाच्या वतीने 'शिक्षण परिषदेचे' आयोजन करून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. अनेक मान्यवर व अधिकाऱ्यांचे उपस्थितीत हे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विविध विषयावर चर्चा करून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच नवीन वर्षामध्ये शैक्षणिक प्रगतीची रूपरेषा आखण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी न.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नूर मोहम्मद खान उर्फ बादशाह खान हे होते.
नगरसेवक प्राध्यापक गजानन खरात, शिवसेना प्रमुख बळीभाऊ मापारी, बादशहा खान, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे तसेच अनेक मान्यवरांनी आपले भाषणातून मार्गदर्शन केले. शैक्षणिक प्रगती करिता शाळांच्या सोयीसुविधा व शिक्षकांच्या मांगण्याकडे प्रथम प्राधान्याने लक्ष देऊन त्याची पूर्तता करू, अशी ग्वाही यावेळी मुख्याधिकारी यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य मनपा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कोल्हे सर हे, संघटनेचे राज्याध्यक्ष श्री अर्जुन कोळी सर यांच्या आदेशान्वये आवर्जून उपस्थित झाले होते. त्यांनी नगरपालिका शिक्षकांच्या समस्या ऐकून घेतले व त्यांच्या सोबत खंबीर उभे राहून सर्व समस्यांचे समाधान करण्याचे आश्वासित केले. न.प. लोणार येथील शिक्षका कडे संघटनेचा विशेष लक्ष राहील हेही त्यांनी यावेळी शिक्षकांशी चर्चा करताना स्पष्ट केले.
शिक्षण सभापती बादशाह सेठ यांनी आपल्या भाषणातून आश्वासित केले की शाळा विषयी सकारात्मक निर्णय घेऊ व अनेक वर्षापासून वर्ग नववी व दहावी उघडण्याची पालकांची प्रलंबित असलेली मागणी पुढील वर्षापासून नगरपालिकेच्या शाळेत हायस्कूल सुरू करून पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. जेणेकरून गरीब व फी भरू न शकणाऱ्या पालकांना त्यांच्या पाल्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्यास सोयीचे ठरेल. दिल्ली शाळेचे अभ्यास दौरा करून आलेले न.प. लोणारचे शिक्षक राजू वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व वानखेडे सरांनी दिल्ली शाळेचे मॉडेल आणि तेथील शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले, तसेच उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोहेल सर यांना बालरक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम सर यांनी सांभाळले तर कार्यक्रमा मध्ये विशेष मार्गदर्शन प्रशासन अधिकारी सतीश कापुरे सर यांनी केले. यावेळी नववर्षाच्या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षकांकरिता करिता जेवणाची व्यवस्था सुद्धा शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होते.
या कार्यक्रमामध्ये नगर परिषदेचे सर्व सदस्य साहेबराव पाटोळे, राजुभाऊ मापारी, तोफिक कुरेशी, बळीभाऊ मापारी, आबेद खान मोमिन खान, गजानन जाधव, भूषण भाऊ मापारी, छगन कंकाळ सर, गजानन खरात सर, डॉक्टर अनिल मापारी, समद भाई, केंद्रप्रमुख राठोड सर, पत्रकार बंधु आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता इस्माईल सर, कदीर सर, खालील सर, शमशुद्दीन सर, शमीम सर, जावेद सर, सलीम सर, आमेर सर, बरकत सर, पंजाब सर, मोरे सर, राऊत सर, पुरी सर, वानखेडे सर, सावंत सर सोबतच महिला शिक्षकांनी परिश्रम घेतले.
प्रतिक्रिया
"नगरपालिका शाळेत सुविधांची कमतरता पडू देणार नाही तसेच पुढील शैक्षणिक सत्रापासून वर्ग ९ व १० ची सुविधा उपलब्ध करून देऊ"- बादशाह खान शिक्षण सभापती न.प. लोणार
"नगरपालिकेचे शाळा ISO प्रमाणित झालेले आहेत. आता त्या पलीकडेही जाऊन शाळांमध्ये दिल्ली मॉडेल राबविणार" - विठ्ठल केदारे मुख्याधिकारी, न.प. लोणार