वंदणा गवई प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
चिखली : लोक सहभागातून तेल्हारा गावातील स्मशानभूमी स्वच्छ व सुदर करण्याचे तेल्हारावासियांचे स्वप्न आहे. आज अनेक गावांमध्ये स्मशानभूमी ची खुप दुरावस्था आहे. तेल्हारा गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ किरण ताई संजय गाडेकर यांच्या कल्पनेतून तेल्हारा येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे . गावातील स्मशानभूमी ही चांगली असणे आवश्यक आहे.
या सौंदर्यीकरणासाठी गावातील लोक पुढाकर घेऊन आर्थिक मदत करत आहेत . याचाच एक भाग स्मशानभूमी सौंदर्यीकरण करण्यासाठी पाम ट्री ची झाडे तेल्हारा येथील प्राध्यापक गजानन कुटे सर व संगिताबाई ठोंबरे यांच्या सहकार्याने देण्यात आली. हा वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक १९/१/२२ रोज बुधवार ला गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच माणिकराव गाडेकर, गजानन कुटे,संगिताबाई ठोंबरे, बबनराव पानझाडे, भास्कर कुटे, मनोज कुटे, रुपराव कुटे, अश्वमेध कुटे,विष्णु कुटे, रमेश कुटे, मधुकर कुटे, जगदेव जाधव, शेख रशिद , शे हबीब , नंदु कुटे, ग्रामसेवक ननकर, मालताबाई ठोंबरे, सुदर्शन कुटे, मोहन मोसंबे, आनंदा गाडेकर, शेनफड कुटे, प्रल्हाद ठोंबरे, दिलीप गाडेकर यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.