जामनेर
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील डॉक्टर चारुदत्त साने यांची कन्या ऐश्वर्या साने ही प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात सांस्कृतीक कार्यक्रमात शेंदुर्णीच्या ऐश्वर्या साने यांच्या गृपचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे . यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्याचा समावेश करण्यात आला आहे . मुलं मोठी होतात आपापलं कार्यक्षेत्र निवडतात तसंच शेंदुर्णी ची सुकन्या हि डॉ. चारुदत साने व डॉ.कौमुदी साने यांची मुलगी .हिने जर्मन या फॉरेन लँग्वेज मध्ये ग्रॅज्युएशन करून कथ्थक या हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्या ची पदवी संपादन केली पंधरा वर्षे अथक परिश्रम घेऊन गुरु तेजस्विनी साठे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली ती घडली व अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरस्कार मिळवून यशस्वी होत आहे नृत्य हा तिचा श्वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज भारतामध्ये सर्वदूर व परदेशातही अनेक कार्यक्रमाद्वारे ती आपल्या नृत्याची छाप पाडत आहे .
आज सांगायला अभिमान वाटतो की दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात तिच्या ग्रुप बरोबर पथनाट्य करणार आहे यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्याचा कथक चा समावेश 26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या संचलनात केला आहे . यावेळी भारताचे माननिय राष्ट्रपती , पंतप्रधान तसेच देश विदेशातील मान्यवरांची उपस्थिती असेल . या संचलनातील सांस्कृतिक कार्यक्रम निवडी साठी 2 चाचणी फेऱ्या मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या तिथे गुरु तेजस्विनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी ऐश्वर्याच्या ग्रुपने कथ्थक नृत्य सादर केलं व त्यांची निवड झाली व वंदे भारतीयम या कार्यक्रमांतर्गत 10.30ते 12.30या वेळेत त्यांचे नृत्य सादर होईल यासाठी त्यांचा समूह 8 जानेवारीला दिल्ली येथे गेला रोजचा सराव व शेवटचा आठवडा कडाक्याच्या थंडीत धुक्यात पावसात सराव करताना एक वेगळा अनुभव व देशाभिमान त्यांना जाणवला गुरू तेजस्विनी साठे यांनाही नृत्य दिग्दर्शन करण्याचा बहुमान मिळाला
.कुमारी ऐश्वर्या ही शेंदुर्णी च्या प्रसिद्ध हदयरोग तज्ञ कै. डॉक्टर चारुदत्त साने व हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्षा डॉ.कौमुदी साने यांची सुपुत्री असून याप्रसंगी आजी मंगला साने भाऊ डॉक्टर कल्पक साने वहिनी सौ ऋचा साने सर्व साने कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन केले तसेच शेंदुर्णी येथील मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदिर शेंदुर्णी तसेच श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे आपल्या कलेद्वारे तिने आपल्या गावाचे म्हणजे शेंदुर्णी या गावचे आपल्या राज्याचे देशाचे नाव उंचावले अशी भावना समस्त शेंदुर्णी कर नागरिकांमध्ये असून सर्वांना तिचा अभिमान असून सर्वांनी शुभेच्छा पर अभिनंदन केले आहे