Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Responsive Ad Here

मो.असलम परवेज

"बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) च्या वतीने मुख्यमंत्रीकडे मांगणी"


   हजरत टिपू सुलतान (रह. अ) यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने लोणार तहसीलदार श्री सैफन नदाफ यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मुंबई येथे मालवाणी परिसरातील एका मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यात आले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून मुस्लिम समाजाच्या  भावना दुखावल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.  



                 टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई लढत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती पण दुर्देवाने त्यांच्या नावाला विरोध करून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम राजकीय मंडळी करत आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून ते एका धर्माच्या विरोधात लढणारे व्यक्ती होते असे संबोधून या महापुरुषाचा अपमान केला आहे, म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेन्द्र शिंगणे यांना देण्यात आलेल्या आहेत.
             सदर निवेदनावर तोसिफ तोफिक कुरेशी, मोहम्मद आकीब  कुरेशी (जिल्हा सचिव ओबीसी विभाग) मोहम्मद आसिफ कुरेशी, अफरोज शेख, मुस्‍तकीम शेख, समीर कुरेशी, शेख जुबेर, शेख अहमद, शेख गुलाब, जब्बार खान, वसीम कुरेशी, वसीम रहमान चौधरी, जुबेर शेख रहीम,साहिल शेख बद्रुद्दिन,   शेख मुर्तजा बुबन, शेख इम्तियाज इस्माईल शेख अहमद शेख सद्दू, मोहसिन मुस्तफा शेख, वसीम कुरेशी, इक्बाल शेख, अरबाज खान, मुस्तफा शेख, आदींचे स्वाक्षर्‍या आहेत.