Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगर पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी धावणार स्कूल बस

Responsive Ad Here

मो.असलम परवेज:तालुका प्रतिनिधि


नगर परिषद शिक्षकांचा  नाविन्यपूर्ण उपक्रम : लोणार पालिका ठरली स्कूल बस चालवणारी जिल्ह्यातील पहिली शासकीय शाळा

    दिनांक ०६ एप्रिल २०२२ रोजी नगर परिषद कन्या शाळा लोणार येथे शाळा व्यवस्थापन समिती व लोणार नगरपालिका अधिकारी पदाधिकारी व शिक्षक वृंद यांची सहविचार सभा तथा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.  सहविचार सभा व प्रशिक्षण संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्कूल बसचे लोकार्पण करण्यात आले. लोणार नगरपरिषद स्कूल बस चालवणारी ही जिल्ह्यातील पहिली पालिका ठरली आहे हे विशेष.

                    विद्यार्थ्यांचे दाखल्यांकरिता दारोदारी शिक्षकांना फिरतांना आपण नेहमीच पाहत असतो. दिवसांदिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळेतून कमी होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळतो, परंतु लोणार नगरपालिकेच्या मराठी व उर्दू शाळांची परिस्थिती या उलट आहे. या शाळांचे नवनवीन उपक्रम, दर्जेदार शिक्षण, गुणवत्ताधारक शिक्षक, शाळेमधील असलेली सर्व आवश्यक भौतिक सुविधा या सर्व बाबींमुळे लोणार नगर परिषद शाळांची पटसंख्या दिवसांदिवस वाढतच चाललेली आहे. शाळा आयएसओ प्रमाणित झालेले असून येथे डिजिटल लर्निंग द्वारे शिक्षण दिला जातो. पालिकेच्या शाळा लोणार शहरांमध्ये पालकांची १ नंबरची पसंती ठरले आहे. याचे नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी तसेच शिक्षकांना अभिमान आहे. 



                शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अजून भर टाकून नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी तसेच शिक्षकांनी  शाळा करिता स्कूल बसची व्यवस्था केली. शाळेमध्ये जवळ पास १ ते ३ किलोमीटर पासून विद्यार्थी येत असतात. सर्व विद्यार्थी गोर गरीब कुटुंबातून असल्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च भागवू शकत नाही व खाजगी वाहनचालक त्यांच्याकडून जादा दराने पैसे घेऊन शाळेपर्यंत सोडतात. दररोजच्या येण्या-जाण्याचा खर्च गरीब पालक उचलू शकत नाही ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच  विद्यार्थ्यांचे सोयी-सुविधा करिता शिक्षकांनी नगरपालिका मुख्याधिकारी सर्व पदाधिकारी यांच्याशी सहविचार करून शाळेसाठी स्वतःच्या पैशातून बस घेण्याचे ठरविले व ते  एका आठवड्यातच पूर्ण करून  दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी त्याचे लोकार्पण करून विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू पण करण्यात आले.

                   यावेळी नगरपालिका, नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, सर्व न.प.पदाधिकारी, मुख्याधिकारी, लोणार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गट साधन व्यक्ती, न.प. शिक्षक वृंद, सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, बहुसंख्य पालक वर्ग, आणि विद्यार्थी उपस्थित होते.