Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिचारिका वर कारवाई करा हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

Responsive Ad Here

 `    योगेश सोनोने प्रातिनिधि मलकापूर 

उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील परिचारिकेने रुग्णालयातील भारतीय रुग्णांना सलाईन लावण्यासाठी अस्वच्छ सिजर चा वापर करून रुग्णांची जीव धोक्यात घातल्या प्रकरणी कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन हिंदी-मराठी पत्रकार संघा तर्फे उपविभागीय अधिकारी  या निवेदनात नमूद केले आहे की गेल्या दोन वर्षापासून देशाला कोरोना  संकटाने ग्रासलेल्या आहेत त्यापासून बचावासाठी हॅन्ड ग्लोज, फेस मास्ट सैनेटायझर इत्यादी गोष्टीचा वापर करण्याच्या सूचना असताना उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील वार्डात भरती असलेल् पेशंटला सलाईन लावताना हायजेनिक अब्रो टेप चा वापर न करता त्याऐवजी सलाईन च्या कार्टून ला येत असलेल्या अस्वच्छ स्टिकर चा वापर सलाईन लावण्यासाठी आपल्या हॉस्पिटल मधील परिचारिका मंगला उईके करत होत्या कोरोना संसर्ग लक्षात घेता कोणत्या प्रकारचे सुरक्षा साधने तर त्यांनी वापरली नाहीच शिवाय सलाईन लावण्यासाठी असलेल्या हायजेनिक चिकटपट्टी चा वापर त्यांनी जाणीवपूर्वक टाळला. 



    यासंदर्भात यांना विचारणा केली असता चिकट टेप घेण्यासाठी ऑफिसमध्ये जावे लागते म्हणून वार्ड मध्ये पडलेल्या अस्वच्छ स्टिकर लावण्याचे त्यांनी सांगितले. अशा अस्वच्छ स्टिकर मुळे कोरोना, एड्स सह इतर जीवघेण्या रोगांचा संसर्ग होण्याचे नाकारता येत नाही. याबाबत दवाखान्यातील या परिचारिका मंगला उईके यांना विचारले असता, त्यांनी  तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते वैद्यकीय अधीक्षकांना सांगा आणि सलाईन लावून तुमच्यावर उपकार केलेत आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवत आहेत अशा भाषेत पेशंट ची कान उघडणी करण्यात आली. सदर परिचारिका बुलढाणा येथून अपडाऊन करीत असल्यामुळे बुलढाणा जाण्यासाठी ड्युटीच्या वेळेआधीच घाईघाईने निघून जाते त्यामुळे घाई घाई मध्ये रुग्णांच्या जीवांची अशा पद्धतीने खेळ करते. तरी मेहरबान साहेबानी सदर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिचारिका वर कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे जेणेकरून पुन्हा रुग्णांच्या जीवाशी अशा प्रकारे कोणताही कर्मचारी खेळ करणार नाही हॉस्पिटलमधील डॉक्टर परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने जसे हॅन्ड ग्लोज मास्क वापरणे बंधनकारक करावे व त्यांना आपले ओळखपत्र किंवा नेम बॅच नेहमी सर्व नागरिकांना दिसतील अशा पद्धतीने परिधान करणे सक्तीचे करावे हॉस्पिटलमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तक्रार रजिस्टर सर्व नागरिकांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करून अशा पद्धतीची गैरसोय होणा याची दक्षता घ्यावी.


    सदर निवेदन देताना धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हास भाई शेगोकार तालुका अध्यक्ष , अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, प्रा प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, योगेश सोनोने शहर संघटक, नथुजी हिवराळे ज्येष्ठ पत्रकार, विनायक तळेकर, करणसिंग सिरसवाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.