Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वेल्डिंग मारताना अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागली आग सुदैवाने कोणतीही जीविहानी नाही

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूर:- शहरालगत असलेल्या फातिमा नगर भागातील जय हिंद वेल्डिंग वर्क्स या वेल्डिंग वर्कशॉप दुकान वर आज रोजी दुपारी 3,30,च्या सुमारास वेल्डिंग मारण्याकरिता आलेल्या आयशर कंपनी चे वाहन क्रमांक एम एच 28 ए बी  78 80 या वाहनाला या वर्कशॉप चे मालक इमरान खान हे वेल्डिंग मारत असताना या वाहनांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले व या वाहनाला आग लागली वाहनाला आग लागताच स्थानिकांची तारांबळ  उडाली होती .



घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रमोद दादा अवसरमोल यांनी क्षणाचाही विलंब न करता योगेश घुगे आरोग्य अधिकारी   नगरपरिषद मलकापूर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली व अग्निशामक दलाच्या वाहन पाचारण करण्यास सांगितले, अग्निशामक दलाचे वाहन चालक वासू भोपळे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व ही वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले ही आग एवढी भीषण होती की या आगीत हे संपूर्ण वाहन जळून खाक झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत?