प्रतिनिधी अपरेष तुपकरि
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली. जगदीप धनखड ११ ऑगस्टरोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
दरम्यान, विद्यमान उपराष्ट्रपती वैंकया नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टरोजी संपणार आहे. त्यामुळे भारताचे १४ वे उपराष्ट्रपतील म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. जनता दल (युनायटेड), वायएसआरसीपी, बसपा, एआयएडीएमके यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने धनखड यांचा पक्का मानला जात होता. तर अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसनंतरचा दुसरा सर्वात मोठा विरोधीपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) पाठिंबा मिळवण्यात अल्वा यांना अपयश आले होते.
