Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आ. सौ. महाले यांच्या वतीने नवरात्रीत नऊ नारी शक्तीचा सन्मान

Responsive Ad Here

 चिखली

     चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी अद्वितीय काम केलेले आहे त्या स्त्री शक्तिचा सत्कार होऊन त्यांनी केलेले कार्य जगासमोर आले पाहिजे त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव होऊन इतरांना सुद्धा तसे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली पाहीजे. या उदात्त हेतूने ‘सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा' या अभियाना अंतर्गत दरवर्षी प्रमाणे स्त्री शक्तीचा सर्वात मोठा उत्सव नवरात्र सुरू होत आहे. या नवरात्रीत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या नऊ स्त्री शक्तिचा सत्कार मा आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन करणार आहे.

    नवरात्र हा हिंदु धर्मीयांचा स्त्रीशक्ति पूजनाचा उत्सव आदिशक्ती दुर्गेच्या नवरात्रीत नऊ रुपांचे पूजन, अर्चन करून तिला प्रसन्न केल्या जाते. देवी रुपात स्त्री शक्तीची पूजा केली जाते त्याच धर्तीवर आ सौ श्वेताताई महाले या नवरात्रीच्या नऊ दिवसात समाजात ज्या स्त्रियांनी आपल्या स्वबळावर कर्तृत्वाचा ठसा निर्माण केला आहे. त्या नारी शक्तीचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून खऱ्या अर्थाने जिवंत दुर्गा पूजेने नवरात्र साजरे करणार आहे. यामध्ये ज्या स्त्रियांनी काही उत्कृष्ट कार्य केलेले पण आतापर्यंत त्यांचे कार्य दुर्लक्षित आहे त्यांना साडी चोळी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.


स्त्रियांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत असल्याचे चित्र आहे. समाजात अशा काही स्त्रिया आहे ज्यांना निसर्ग, समाज, परिस्थिती, शासन, कुटुंब विपरीत असताना त्यांनी सर्वांींवर मात करून समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते काम करत असताना अनेकांनी अडथळे निर्माण केले असेल त्या अडथळ्यांना पार करून त्यांची उद्दिष्टपूर्ती कडे वाटचाल सुरू असेल, आज त्या इतरांसाठी प्रेरणा ठरत असेल, ज्यांची आतापर्यंत कुणी दखल घेतलेली नसेल अशा स्त्री शक्तीचा सन्मान आ सौ श्वेताताई महाले करणार आहे. विधा मतदारसंघातील ज्या महिलांनी अद्वितीय काम केलेले आहे. त्या स्त्री शक्तिचा सत्कार होऊन त्यांनी केलेले कार्य जगासमोर आले पाहिजे. त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव होऊन इतरांना सुद्धा तसे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली पाहीजे. या उदात्त हेतूने हा गौरव करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने स्त्री शक्तीचा सर्वात मोठा उत्सव नवरात्र सुरू होत आहे. या नवरात्रीत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या नऊ स्त्री शक्तिचा सत्कार मा आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन करणार आहे.