Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले

Responsive Ad Here

  


 प्रतिनिधी

  बुलढाणा जिल्ह्यात आज अतिशय धक्कादायक घटना घडली. धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यानंतर त्यांना जळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आलं.

   मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. 

   हा अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडलेले आहेत , विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील अस या दोन्ही तरुणांच नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.

                     संतप्त रहिवाशांचा आगारावर हल्लाबोल

दरम्यान संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचाराला. जवळपास 200 जणांचा जमाव इथे होता. परिणामी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.