अपरेशराजे तुपकरी विदर्भ ब्युरो चिफ
डॉ. राजेंद्र गोड़े कॉलेज ऑफ फार्मेसी, मलकापुर व केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट सप्ताह निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे आज दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. मितेश टावरी, डॉ.श्रीकृष्ण वाघ, डॉ. राजेश झंवर यांनी आपल्या सेवा दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गावाच्या महिला सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील, ग्रामसभेच्या सदस्या सुरेखा झांबरे, शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर, मलकापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मालपाणी, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील व इतर फार्मासिस्ट बंधू गणेश वराडे, अमोल नाफडे, महाजन साहेब, दिनेश चांडक , निलेश खर्चे, सौरभ चांडक, अजय शर्मा व महाविद्यालयाचे डॉ. वैभव आढाव व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौतम मेहेत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशाली तलोकार व आभार प्रदर्शन प्राध्यापक मुकेश बाभुळकर यांनी केले. या वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये शाळेतील 103 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ठेंगे, डॉ. चिंचोले, प्रा. नारखेडे, प्रा. रितेश पोपट , प्रा. पडोळे, प्रा. रिंढे व शिक्षकेतर कर्मचारी कांडेलकर, घनोकार आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका यांनी कष्ट घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर व इतर शिक्षक आणि समस्त ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
