प्रतिनिधी
आज दिनांक 28 सप्टेंबरला मलकापूर जि बुलढाणा येथे फसव्या नागपुर कराराची होळी करण्यात आली. गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्रात बळजबरीने सामील करून विदर्भातील जनतेला कायमच फसविण्यात आलेले आहे. जो करार त्यावेळी करण्यात आला होता त्या करारा प्रमाणे एकाही सरकारने विदर्भातील जनतेला कधीच न्याय दिला नाही हेच वास्तव आहे.म्हणून या खोट्या नागपुर कराराची होळी संपुर्ण विदर्भात करण्यात आली. त्याच प्रमाणे मलकापूर जि बुलढाणा येथेही ह्या फसव्या कराराची होळी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दामोदर शर्मा, रणजितभाऊ डोसे, बाबुराव पाटील, सुनीलभाऊ खाचणे,हरीदास गणबास, सोपानभाऊ सपकाळ, पुंजाजी देवीकार, मुजाहदऊल्लाखां, कुंजीलालजी धुत हे सर्व विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे कार्यकर्ता हजर होते
