Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे नागवेली इलेक्ट्रिक सेल दुकान फोडले

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील संभाजीनगर महामार्गावर रोडच्या बाजूला नागवेली इलेक्ट्रिकल सेल्स या दुकानात आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील पाच ते सहा लाखाच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्याची घटना घडली असून सविस्तर माहिती अशी की पहूर येथील राजु बाबु बारी यांच्या मालकीच्या नागवेली इलेक्ट्रिकल दुकानात आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील बुशिंग कापर वायर व कापर वायर भंगार असे इलेक्ट्रिक वस्तू पाच ते सहा लाख रुपये किमतीची चोरट्यांनी पळून नेली आहे .

अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांची अज्ञात चोरट्याने दुकानातील इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेले

    दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून तसेच सीसीटीव्ही बॉक्स सुद्धा चोरट्याने पळून गेले आहे पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड ठाणे अंमलदार रवींद्र देशमुख भरत लिंगायत ईश्वर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दुकानात जाऊन पाहणी करून पंचनामा केला यापूर्वी या दुकानात दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता जळगाव येथून ठसे तज्ञ पथक बोलवण्यात आले पहुर पोलीस ठाण्यात राजू बाबु बारी यांच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे संभाजीनगर महामार्गावरील दुकानात चोरी झाल्यामुळे पहुर शहरातील व्यापारी भयभीत झाले आहे पहूर शहरात चोरीची घटना पाहता‌ पोलिसांनी गस्त वाढावी अशी मागणी जनतेतून होत आहे