पत्रकार राहुल संबारे बेलाड
बेलाड गावात अवैध दारु बंदी करण्यासाठी वारंवार निवेदन देवून आंदोलन करुण त्याची दखल न घेतल्या ने संतंप्त गावकरी बेलाड ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. दिपमाला देवानंद इंगळे, विजय काटे व शेकळो महिला व युवाकांचा मा. पोलिस अधिक्षक साहेब बुलढाणा, व जिल्हा अधिक्षक साहेब बुलढाणा कलेक्टर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला
मलकापूर तालुक्यातील बेलाड गावामधे अवैध दारू विक्री चा जोर वाढला असुन त्यामुळे गावातील तरुण व माणसे मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत. तथा या मुळे गावात भांडणांचे प्रकार वाढत आहेत. गावात दारु बंदी व्हावी व तसा ठराव घ्यावा यासाठी वारंवार बेलाड ग्रामपंचायत ला वारंवार निवेदन देवून आंदोलन करण्यात आले आहे तसेच स्थानिक पोलिस प्रशासन यांना सुद्धा या बाबत निवेदन दिले आहे. परंतु अद्याप बेलाड गावातील दारु बंदी करण्यात आली नाही. बेलाड मुक्त पणे अवैध दारु विक्री केली जात असुन नागरीक देखील दारुपिण्यासाठी व घेण्यासाठी येतात
दारु बाजांकडून गलीबोळात व चौकाचौकात अनेक वेळा गडबड गोंधळ करीत अश्लील शिवीगाळ केली जाते. त्यामुळे येथील शाळेतील शेकळो विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरीकांना व महीलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात दारु च्या आहारी जात आहे. कित्येक लोकांना दारु मुळे मुत्यु सुद्धा ओढावला आहे गावात असणारे दारु चे दुकान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या गुन्हेगाराचे, गुन्हेगारी चे केंन्द्र बनले आहे.
अवैध दारु मुळे महीलांना घरगुती समस्या निर्माण होते हे उघड सत्य आहे याची माहीती राज्य महिला आयोगाकडून समोर येत आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 47 नुसार नागरीकांचे आरोग्य संभाळणे हे नागरीकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुशंगाने आपण बेलाड गावातील सुरु असलेली अवैध दारु विक्री पुर्णपणे बंद करावी . राज्यघटनेचा व जनमतांचा आदर करावा ही विनंती. गावातील दारु विक्री बंद न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उपोष्ण सुरु करणार तथा यामधे होणार्या परीणामांना सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील यांच्या कडे देण्यात आले यावेळी सौ.दिपमाला देवानंद इंगळे, विजय काटे यांच्यासह शेकडो महिला व युवा गावकरी उपस्थित होते.
