ते म्हणतात ना जसे पेराल तसेच उगवेल, याचीच पावती म्हणजे आबांचा अंत्यविधी आणि त्यात झालेले प्रचंड जनसमुदायाचे विराट दर्शन. ना मोह सत्तेचा ना श्रीमंती पैशाची..कर्तुत्वाने इतिहास रचला कीर्ती सांगतो तैशाची.
खरंतर आबांना सत्तेचा मोह कधीच नव्हता..आबांच्या संपूर्ण जीवन कारकिर्दीत अाबांनी एकदाच ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यातही गावातील सर्वोच्च पद भूषविले (सरपंच) मात्र त्यानंतर परत एकदा ही त्यांनी सत्तेचा मोह धरला नाही हीच त्यांच्या मनाची श्रीमंती आज अजरामर ठरत आहे.आजीवन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीर पणे उभे असणारे आबा सतत 35 वर्ष सोसायटीच्या अध्यक्षस्थानी विराजमान असतानाहीपदाची गरिमा कामाची नैतिकता आणि चांगल्या विचारांप्रती असलेली स्वाधीनता अाबांनी कधीही सोडली नाही.
आबा जाऊन झालेल्या या दहा दिवसांच्या कालखंडात पंचक्रोशीतील अनेक *मातब्बर नेते, शेतकरी नेते, आमदार खासदार यांचे प्रतिनिधी, त्यासह अनेक शासकीय व निमशासकीय अधिकारी* यांनी हजेरी लावलीखरंतर हीच ती आबांनी कमावलेली खरी श्रीमंती.धर्म आणि संप्रदाय यांच्यावर आबांची विशेष आस्था होती..महानुभावपंथातून येणारे आबा यांनी पंथाच्या विचारांचा प्रसार आजीवन केला यतो धर्म ततो जया* जेथे धर्म तेथे च विजय म्हणून श्वासाप्रमाणे माणसाला धर्मही तितकाच महत्त्वाचा आहे *मग तो धर्म कोणताही असो हीच ती आबांची शिकवण आज आदर्श विचारांची पावती देत आहे.
आबांच्या धर्माविषयी असलेल्या आस्थेमुळे आणि धर्मप्रसाराच्या अगदीक प्रयत्नांमुळे श्री क्षेत्र जाळीचा देव त्यासह महानुभाव पंथाच्या अनेक तीर्थ क्षेत्रावरून पंथांचे अनेक अनुयायी, साधू महंत आबांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. खरंतर हाच तो आबांच्या विचारांचा प्रभाव होता.नाशिवंत देह जाणार सकळ.खरंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जायचेच आहे.. परंतु विचारांची शेतजमीन पेरत आबांनी जो पुण्याईचा साठा निर्माण केला निश्चितच भावी काळात तो त्यांच्या कुटुंबीयांच्या कामा येईल.ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडूनही सकल जनसमुदायांच्या मनात त्यांच्या विचारात ती जिवंत होती.अगदी त्याच पद्धतीने आबांचा आदर्शवान जीवन प्रवास, अलौकिक धार्मिक राजकीय व सामाजिक कार्य, निरंतर समाजाच्या हृदयात राहतील यात शंका नाही.आबांच्या पुण्य आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
