Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विवाहित प्रेमी युगुलाचा लॉजमध्ये गळफास • खामगावातील आदर्श लॉजमध्ये आयुष्याची अखेर अंत

Responsive Ad Here

 


 प्रतिनिधी

    विवाहित प्रेमी युगुलाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवकाने व्हिडीओ कॉल करुन भावाला आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. बुलडाण्यातील खामगाव येथील कॉटन मार्केट समोरील आदर्श लॉजमध्ये आयुष्याची अखेर केली. दोघेही स्वतंत्रपणे विवाहित असताना दोघा जणांचे प्रेम संबंध होते. या प्रेमी युगलाने आज आदर्श लॉजमध्ये गळफास घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकराने त्याच्या भावाला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. विकास पंजाबराव सावळे (२७) रा. कळंबी ता. बाळापूर ह. मु. इंदौर हा आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्याची प्रेयसी सौ. शितलसुनिल नितोने (२४) हिला घेऊन येथील आदर्श लॉजवर आला. 

    त्याने शितल ही आपली पत्नी असल्याचं सांगून लॉजवर खोली घेतली होती. काही वेळानंतर विकासने व्हिडीओ कॉल करून त्याच्या भावाला शेवटचं घे पाहून असं सांगत आत्महत्या करत असल्याबाबत कळवलं. त्यानंतर विकास सावळे व शितल नितोने या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली विकासचा भाऊ लॉजवर आल्यानंतर लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेवून पंचनामा करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत. विवाहित आत्महत्या केलेले हे दोघेही प्रेमी युगल विवाहित होते. सौ. शितल नितोने (२४) रा. नांदुरा हिला २ मुलं १ मुलगी असून पती सुनिल हे अपंग आहेत. आत्महत्या केलेले हे दोघेही प्रेमी युगल विवाहित होते .शितल ही मुंबई येथे पेशंट सांभाळण्याचे काम करायची तर तिचे माहेर खामगाव तालुक्यातील कंझारा आहे. तसेच मृतक विकास पंजाबराव सावळे (२७) रा. कळंबी ता. बाळापूर याला देखील दोन मुलं आहेत तो इंदौर येथे मशीन ऑपरेटरचे काम करीत होता. त्यामुळे तो तिथेच राहायचा अशी माहिती प्राप्त झाली आहे

दरम्यान, पहाटे ६ वाजेच्या सुमारास शितल व विकास यांनी स्थानिक कॉटन मार्केट विकमशी चौकाजवळच्या आदर्श लॉज येथे रूम नंबर १०६ ही पती-पत्नी असल्याचे सांगून घेतली होती. सकाळी १० ते १०.३० पर्यंत सदर रूमचा दरवाजा बंद दिसल्याने शंका आली. तेव्हा लॉज मालकाला दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे ही माहिती खामगाव शहर पोस्टेला लॉज मालक यांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात रवाना केले. शवविच्छेदनानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.