Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पायोनियर कंपनीकडून जामनेर येतील भूमिपुत्र रवींद्र महाजन या प्रगतशील शेतकऱ्याचा सत्कार

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    राष्ट्रीय शेतकरी दिवसा निमित्त आज जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र महाजन यांनी वसंतराव नाईक तसेच उद्यानपंडित असे कृषी शेत्रातील पुरस्कार प्राप्त केले  याचीच दखल घेऊन पायोनियर कंपनीचे झोनल मॅनेजर तसेच जामनेर चे सेल्स ऑफिसर प्रमोद जाधव यांनी रवींद्र महाजन यांचा सत्कार मागील सहा महिन्यांपासून  नियोजन केले होते पण आज राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे अवचित साधून सत्कार केला आणि राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या शुभे्छा दिल्या 


आपण शेतकरी दिवस का साजरा करतो

    चौधरी चरण सिंह यांचे वडील स्वतः शेतकरी होते. कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती अंत्यत गंभीर होती. तसेच चरण सिंह हे शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या जन समस्यांची पूर्णपणे जाण होती. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. केवळ सहा महिने पंतप्रधानपद भूषविलेल्या चरण सिंह हया नेत्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यामुळे आज त्या व्यक्तीच्या नावाने भारतीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. त्यामुळे निदान हक्काच्या दिवशी तरी मागण्या पूर्ण होतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे हे पंतप्रधान होते तरी कोण? चौधरी चरणसिंह, असे त्या दिवंगत पंतप्रधानांचे नाव आहे.

     त्यांना आज देखील शेतकरी आपले नेते मानतात. राजकीय नेते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले ते आजपर्यंत कुठल्याही नेत्याने केलेले नाही. त्यांनी १९७९ मध्ये देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मात्र, बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे ते केवळ १४ जानेवारी १९८० पर्यंत म्हणजेच सहा महिने पंतप्रधान पदावर कार्यरत होते.  अनेक मजूर, शेतकरी इत्यादी लोकांच्या सहवासात ते वाढले होतेया कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद जाधव तर आभार विठ्ठल गोरे यांनी मानले