Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री.योगेंद्र वानखेडे यांना शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

        जामनेर तालुक्यातील  पहूर येथील रहिवाशी श्री योगेंद्र प्रल्हाद वानखेडे यांची शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. योगेंद्र वानखेडे जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता-पाचोरा येथील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सन २००४ पासून द सेकंडरी संस्था शेंदुर्णी,पळासखेडा,पाळधी, व आता लोहारा येथील शाळेत शैक्षणिक कार्य सुरू,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात २०१९-२०२० या दोन्ही वर्षात पहूर येथे स्वखर्चाने चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधू वर मेळावा मोफत आयोजित केलेला होता.


ते राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पहूर चे विद्यमान अध्यक्ष आहेत.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन.हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. वानखडे यांचे शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे माजी सरपंच प्रदीप लोढा उपसरपंच श्याम सावळे शैलेश पाटील आदींनी अभिनंदन केले