Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री, संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर १५४ लाभार्थ्यांनी केली तपासणी

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

शहरातील कमल हॉस्पिटल ठिकाणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर चे उद्घाटन शहराच्या नगराध्यक्षा सौ.साधना ताई  महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटनेता डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक बाबुराव हिवराळे निलेश पाटील सोपान चौधरी सुभाष चौधरी डॉक्टर सरताळे कविता देशमुख उज्वला गोसावी रंजना धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते


कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिरात सुरुवात करण्यात आली याप्रसंगी चंद्रकांत पाटील वैशाली चौधरी निलेश पाटील सर आदींनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र विभागीय  प्रदेश तेली महासंघ अध्यक्षा वैशाली चौधरी तर सूत्रसंचालन सुनील भोडे आभार मयूर चौधरी. यांनी मानले या आरोग्य तपासणी शिबिरात 154 लाभार्थ्यांनी लाभ घेतला

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश उत्तर महाराष्ट्र प्रमुख वैशाली चौधरी दर्शना पाटील पल्लवी सूर्यवंशी विना कासार पुष्पलता पाटील विद्या मोते.. वासंती कुलकर्णी रूपाली पाटील सुनिता भोंडे मनीषा चौधरी रेखा पोळ प्रदेश तेली महासंघ तालुका अध्यक्ष अजय चौधरी खानदेश तेली शहराध्यक्ष निलेश चौधरी तेली समाज पंचमंडळ जामनेर मोहन चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते