Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

Responsive Ad Here

 जामनेर , प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील पहुर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . येथील पहुर पेठ दत्त मंदिरात व पहूर पोलीस ठाण्यात दत्त जयंती निमित्त सत्यनारायण आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे व पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली . पेठ मधील दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे पारायणाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दत्त जयंती निमित्त महापूजन व सत्यनारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसापासून पारायण याचे वाचन पोथी वाचन बाबुराव पांढरे यांनी केले.



दत्त जयंती निमित्त मंदिरामध्ये भाविकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पहुर पेठ दत्त मंदिरात आहे ते सागर कुमावत  सपत्नीक पूजन करण्यात आले या प्रसंगी देविदास कुमावत मच्छिंद्र कुमावत पत्रकार गणेश पांढरे माजी जि प सदस्य राजधर पांढरे मंगलाबाई भावसार केसर बाई तायडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .