Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आर.टी.हायस्कूल पहुरचे विद्यार्थी

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथील 2022 मध्ये झालेल्या इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर आर. टी.लेले. हायस्कूल पहुरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून घवघवीत यश प्राप्त करून ते शाळेच्या इतिहासात ऐतिहासिक सुयशाचे  मानकरी ठरले. शाळेतील एकूण पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे🌹 कु.प्रांजल भाऊसाहेब गव्हाणे हिने 198 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. 🌹 आणि इतर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले सुयश पुढील प्रमाणे:--

🌹 तानेश योगेश बनकर- 184 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून दुसरा आला आहे.

🌹कु. योगिता उद्धव घोंगडे 182 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून सहावी आली.

🌹 विशाल दिनकर घोंगडे हा 156 गुण मिळून जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून 58वा आला.

🌹 कु.वर्षा रवींद्र कुमावत हिने 140 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण

 भागातून 119 वा क्रमांक प्राप्त केला. या परीक्षा आधी झालेल्या NMMS परीक्षेत देखील शाळेतील एकूण नऊ विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळवून गावाला, शाळेला ,पालकांना नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. दूरदृष्टीचे ,उपक्रमशील, उत्साही असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.बी .पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अनेकविध स्पर्धा परीक्षांबाबतचेही संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन ते स्वतः सक्रिय राहून व शिक्षकांच्या मदतीने करीत असतात या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. बी. पाटील सर; पर्यवेक्षक श्री.एस. व्ही. पाटील सर ;व सर्व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांवर पहूर व परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्वांचेच संस्थेचे  , व्हाँ चेअरमन -साहेबराव देशमुख, वरिष्ठ लिपिक- श्री किशोर पाटील भाऊसाहेब, संस्था सचिव डॉक्टर अनिकेत लेले, संस्थेचे संचालक श्री.राजधर भाऊ पांढरे, अँडव्होकेट एस. आर .पाटील आदि सर्व संचालक पदाधिकाऱ्यांनी, पालकांनी, ग्रामस्थांनी अभिनंदन करून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेच्या अत्युच्च प्रगतीकडे चालू असलेल्या वाटचालीबद्दल शाळेशी संबंधित सर्वच घटकांचे सर्वांनी कौतुक केले आहे. शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान,आनंद व्यक्त केला आहे.शाळेचे भविष्य अजून उज्ज्वल राहील, असा आशावाद व्यक्त केला आहे.